#रविवारी,सोमवारी दोन दिवस कार्यक्रम”
संदेश क्रांती न्यूज:
खानापूर प्रतिनिधी
खानापूर शहरातील ज्ञानेश्वर चौक,
चिरमुरकर गल्लीतील मध्यवर्ती सार्वजनिक श्री शिवजयंती उत्सव मंडळाचा शतकमहोत्सवी शिवजयंती उत्सव आज रविवारी दि.१९ व सोमवारी दि.२० रोजी साजरा होत आहे.
आज रविवारी दि.१९ रोजी सकाळी११ वाजता सनई चौघडा तर व्याख्याते अँड.सावली जाधव यांचे शिव जन्मावर व्याख्यान,दुपारी १२.३० वाजता शिवजन्मसोहळा, सायंकाळी ५ वाजता हलगी, लेझिम,लाठी दांड पट्यासह वाजत गाजत शिवपालखीची मिरवणुक होणार आहे.
तर सायंकाळी ६ वाजता राजा शिव
छत्रपती स्मारकात होणार्या पालखी पुजन कार्यक्रमात आमदार विठ्ठल हलगेकर,खानापूर तालुका ब्लाॅक काॅग्रेस अध्यक्ष अँड.ईश्वर घाडी, पी एल डी बॅक चेअरमन मुरलीधर पाटील ,माजी नगरसेवक आप्पया कोडोळी,अध्यक्ष विवेक गीरी,आदी उपस्थित राहाणार आहे.
सोमवारी शिवपुतळ्याचा उदघाटन सोहळा,चित्ररथाचे पुजन!
सोमवारी दि.२० रोजी सायंकाळी ५वाजता ज्ञानेश्वर मंदिर येथे शिवपुतळ्याचा उदघाटन सोहळा व चित्ररथाचे पुजन होणार आहे.
यावेळी आमदार विठ्ठल हलगेकर, श्रीमंत युवराज्ञी संयोगीताराजे छत्रपती कोल्हापुर,श्रीमंत युवराजकुमार शहीराजीराजे छत्रपती कोल्हापुर, डाॅ.किरण ठाकुर संस्थापक लोकमान्य मल्टी व सोसायटी, समुह प्रमुख दै.तरूण भारत, एम एल सी चन्नराज हट्टीहोळी, माजीआमदार दिगंबर पाटील,अरविंद पाटील डाॅ. अंजली निंबाळकर, किरण गावडे,पंढरी परब,मृणाल हेब्बाळकर, काॅग्रेस नेते सुरेश जाधव,राज्य भाजप कार्यकरणी सदस्य प्रमोद कोचेरी,संजय कुबल,माजी जि प सदस्य जोतिबा रेमाणी,बाबूराव देसाई,महांतेश राऊत ,अमृत शेलार, बाळासाहेब शेलार,आबासाहेब दळवी व इतर मान्यवर उपस्थित राहणार आहेत.
तरी सर्वानी उपस्थित राहण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
