संदेश क्रांती न्यूज:
खानापूर प्रतिनिधी
खानापूर शहरातील मराठा मंडळ शिक्षण संस्था बेळगाव, संचलित मराठा मंडळ हायर सेकंडरी स्कूलमध्ये भारतीय संविधानाच्या शिल्पकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची 135 वी जयंती उत्साहात साजरी करण्यात आली.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी हायस्कूलचे मुख्याध्यापक के.व्ही. कुलकर्णी उपस्थित होते.
यावेळी ज्येष्ठ शिक्षक एस डी गुरव , टी आर पत्री, ज्येष्ठ शिक्षिका श्रीमती एलबी जाधव , जे. डी.बीरजे व इतर शिक्षक उपस्थित होते.
प्रारंभी मुख्याध्यापक के.व्ही.कुलकर्णी यांच्याहस्ते डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या फोटो प्रतिमेचे पूजन करून करण्यात आले.
याप्रसंगी बोलताना ज्येष्ठ शिक्षक टी.
आर.पत्री याने आंबेडकरांनी भारतीय लोकांसाठी केलेल्या कामाचे वर्णन केले व आंबेडकरांचे आदर्श सर्वांनी घ्यावा. असे आव्हान केले
अध्यक्षीय भाषणात मुख्याध्यापक के.व्ही. कुलकर्णी म्हणाले की, डाॅ.बाबासाहेब
आंबेडकरांनी आपले संपूर्ण आयुष्य जनकल्याणासाठी व्यतीत केले.भारतीय घटना जगामध्ये सुप्रसिद्ध होण्यास आंबेडकर साहेबांनी घेतलेल्या परिश्रमाचे वर्णन करत आज भारतीय समाज जातमुक्त हो असे सर्वांना आव्हान दिले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन जेष्ठ शिक्षक जे.डी. बिरजे यांनी केले आंबेडकरांचे कर्तृत्व शक्ती कोणत्या पद्धतीची होती. याचे वर्णन जे.डी. बिरजे यानी केले. शेवटी आभार प्रदर्शनाने कार्यक्रमाची सांता झाली.
