संदेश क्रांती न्यूज :
खानापूर प्रतिनिधी
पुणे येथील तारांगण आँडिटोरियम पिंपरी चिंचवड सायन्स पार्क येथे काव्यमित्र संस्थेच्यावतीने २६ व्या वर्षा आयोजित भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर,ज्ञानसुर्य महात्मा जोतिबा फूले आणि आदर्श माता दिपा पोरेडी यांच्या ८व्या स्मृति दिनानिमित्य गर्लगुंजीचे सुपूत्र व निवृत्त सुभेदार अजित पाटील यानी गेली२६ वर्षा सैन्यात सेवा बजावली. आज यांच्या’ माझे गाव गर्लगुजी’ व विश्वास ओव्हळे यांच्या ‘प्रकाश तुफानातील दिव्यांचा’ या पुस्तकांचा प्रकाशन सोहळा नुकताच पार पडला.
अध्यक्षस्थानी जेष्ठ कवी,साहित्यिक तथा मा जी अपर आयुक्त सहसचिव अँड.एस. बी.
पाटील होते.तर प्रमुख अतिथि पुणे म.न.पा.कार्यकारी अभियंता शिरीष पोरेडी व जेष्ठ साहित्यिक विचारवंत प्रभाकर ओव्हाळे उपस्थित होते.
कार्यक्रमाची सुरूवात ग्रंथपुजन व दीपप्रज्वलनाने झाली.
यावेळी प्रास्ताविक डाॅ. संजय जगताप यानी केले.
या वेळी गर्लगुंजीचे सुपूत्र अजित पाटील यांच्या “माझे गाव गर्लगुंजी “व विश्वास ओव्हळे यांच्या ” प्रकाश तुफानातील दिव्यांचा” या पुस्तकांचा उपस्थित मान्यवरांच्याहस्ते प्रकाशन सोहळा पार पडला.
याजबरोबर राष्ट्रीय सेवा गौरव पुरस्कार संजय कांबळे,सुखदेव बागुल,सुरेश कदम,सुधीर करंडे याना दे ऊन करण्यात आला.
राष्ट्रीय उद्योग भुषण पुरस्कार पंढरीनाथ कऊटकर,भानुदास पवळे याना देऊन करण्यात आला.
राष्ट्रीय महिला समाज भूषण पुरस्कार सौ.मेघना वाघ,सौ.रेष्मा कांबळे,श्रीमती रोहिणी कुलकर्णी याना देऊन करण्यात आला.
यावेळी निमंत्रित कवी, कवयित्री संमलेन पार पडले.
यामध्ये जयसिंगराव कांबळे ( निगडी),राजू पेठे ( पुनावेळ), योगिता कोठेकर ( निगडी),नवनीत सरोदे,( संगमनेर), कविता गवारी (जन्नूर), मुक्ता कोरपे(वडगावशेरी),प्रकाश गायकवाड ( देहु), देवेंद्र गावडे (चिखली) आदीचा सहभाग होता.
यावेळी सुत्रसंचालन सौ.तेजश्री पाटील यानी केले.
मुख्य संयोजक काव्य मित्र संस्थेचे संस्थापक अध्यक्ष राजेंद्र विमलाई. श्रीमंत सगर हे होते.
यावेळी सुदेश कदम यानी मनोगत व्यक्त केले.तसेच उपस्थित मान्यवारांनी आपले विचार व्यक्त केले.
कार्यक्रमाला कवी, साहित्यीक नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
कार्यक्रमाचे औचित्य साधुन मान्य रांचा सत्कार करण्यात आला.
