संदेश क्रांती न्यूज :
खानापूर प्रतिनिधी
खानापूर येथील ताराराणी महाविद्यालयाचा
वाणिज्य व कला या दोन्ही शाखांमध्ये बारावीचा्या निकालात विद्यार्थिनींनी उल्लेखनीय यश संपादन केले आहे.
वाणिज्य विभागात कुमारी सबिना एल. लोबो (98.33%), कुमारी समीक्षा एस. झुंजवाडकर (98%)* व कुमारी राजेश्वरी पी. राठोडकर (96.33%) या विद्यार्थिनींनी अनुक्रमे प्रथम, द्वितीय व तृतीय क्रमांक पटकावले असून त्यांनी खानापूर तालुक्यात अव्वल स्थान मिळवून बेळगाव जिल्ह्यातही मानांकन प्राप्त केले आहे. त्यानंतर कुमारी वैश्नवी जी. कोलाडा (94.83%), कुमारी निधी व्ही. गवाणकर (94%), कुमारी अंजली एम. कदम (93.83%), कुमारी अलिशा पी. कुलकर्णी (93%), कुमारी स्वाती डी. घाडी (93%), कुमारी कावेरी पी. अंधारे (91.67%), कुमारी प्राजक्ता पी. कावळेकर (88.33%), कुमारी ऋतुजा आर. सावंत (87.83%), कुमारी पूजा पी. गवाणकर (86.67%) व कुमारी प्रांजल एन. पाटील (85.50%) या विद्यार्थिनींनीही उत्तम यश संपादन केले असून वाणिज्य विभागाचा एकूण निकाल 86.53% लागला आहे.
कला विभागात*……. *कुमारी स्वेता एन. घाडी (85%)* कुमारी संजना एस. कांबळे (83%), कुमारी मधुरा आर. खांबळे (82%), कुमारी प्रतिक्षा एस. पवार (81%) व कुमारी नेत्रा वाय. बागले (81%) या विद्यार्थिनींनी उल्लेखनीय यश संपादन केले असून कला विभागाचा एकूण निकाल 75.92% लागला आहे.
संपूर्ण निकालाचा विचार करता एकूण विद्यार्थ्यांपैकी 79 विद्यार्थिनी विशेष श्रेणी (डिस्टिंक्शन), 27 प्रथम श्रेणी व 11 द्वितीय श्रेणी असे उत्तम यश मिळाले असून एकूण निकालाची टक्केवारी 83% इतकी आहे. विशेष बाब म्हणजे कोणत्याही कोचिंग क्लासचा आधार न घेता केवळ महाविद्यालयातील प्राध्यापकांच्या मार्गदर्शनावर आधारित हे यश संपादन झाले आहे, ही बाब अत्यंत अभिमानास्पद आहे.
या उज्ज्वल यशामागे मराठा मंडळाच्या अध्यक्षा डॉ. राजश्री नागराजू यादव यांचे प्रेरणादायी मार्गदर्शन ,संचालक शिवाजीराव पाटील व परशुराम गुरव यांचे मोलाचे सहकार्य तसेच प्राचार्य अरविंद लक्ष्मणराव पाटील याशिवाय सर्व प्राध्यापक वर्गाची अथक मेहनत व विद्यार्थिनींची जिद्द यामुळेच हे यश शक्य झाले आहे.
हा निकाल केवळ यश नसून महाविद्यालयाच्या गुणवत्तेचा, शिस्तीचा व समर्पणाचा ठसा उमटवणारा असून शिक्षण, क्रीडा आणि सर्वांगीण विकास या तिन्ही क्षेत्रांत महाविद्यालयाने गाठलेली उंची खरंच प्रेरणादायी आहे.


