विज्ञान विभागातुन वनश्री पाटील प्रथम,कला विभागातुन ममता कोंडे प्रथम,तर वाणिज्य विभागातुन रेणुका गुरव प्रथम!
संदेश क्रांती न्यूज:
खानापूर प्रतिनिधी
खानापूर शहरातील श्री स्वामी विवेकानंद शिक्षण सेवा सोसायटी संचलीत श्री स्वामी विवेकानंद पदवीपूर्व (कला, वाणिज्य, विज्ञान) महाविद्यालयाचा पी. यू.सी.प्रथम वर्षाचा १००% निकाल लागला असुन, हलशी ( ता.खानापूर )येथील विद्यार्थिनी कुमारी वनश्री गजानन पाटील हिने ९८% गुण घेऊन विज्ञान विभागात प्रथम क्रमांक मिळविला. कला विभागात कुमारी ममता प्रकाश कोंडे हिने ९२.३३% गुण घेऊन प्रथम क्रमांक मिळविला. वाणिज्य विभागात कुमारी रेणुका गुरव हिने 86.33% गुण घेऊन प्रथम क्रमांक मिळविला. निकाल जाहीर झाल्यानंतर उत्तम गुण घेतलेल्या विद्यार्थ्यांचा श्री स्वामी विवेकानंद संस्था आणि महाविद्यालय प्रशासनातर्फे सत्कार करण्यात आला. सत्कार समारंभावेळी बोलताना प्रिन्सिपॉल पी.के. चापगांवकर यांनी उत्तम यश मिळविलेल्या विद्यार्थ्यांचे अभिनंदन करून त्यांच्या पुढील वाटचालीला शुभेच्छा दिल्या आणि श्री स्वामी विवेकानंद संस्थेचे अध्यक्ष अधिवक्ता चेतन अरुण मणेरीकर यांनी दिलेल्या सहकार्याबद्दल गौरवोद्गार काढले आणि संचालक मंडळ आणि प्राध्यापक वर्गाचे अभिनंदन केले. या वेळी बोलताना संस्थेचे अध्यक्ष अधिवक्ता चेतन अरुण मणेरीकर यांनी महाविद्यालय प्रशासन आणि विद्यार्थी वर्गाचे अभिनंदन करून संस्थेतर्फे या पुढेही गुणवत्तापूर्ण अत्याधुनिक शिक्षण व्यवस्था उपलब्ध करून देण्याची ग्वाही दिली. कार्यक्रमाला पालक वर्ग, संस्थेचे माजी अध्यक्ष दिलीप शहापूरकर आणि प्राध्यापकवर्ग मोठ्या प्रमाणावर उपस्थित होता.

