#ट्रिब्यूनल मेंबर विनायक मुतगेकर यानी केली नुकसान भरपाई देण्याची मागणी!
संदेश क्रांती न्यूज :
खानापूर प्रतिनिधी
निलावडे (ता. खानापूर ) येथील सर्वे नंबर ४२/ २ मधील दिनकर देसाई व प्रभाकर देसाई यांच्या मालकीच्या शेतातील केळीच्या बागेला तसेच विविध जातीच्या झाडाना शिवारातुन गेलेल्या विधुत भारीत तारांचे घर्षण होऊन आगीच्या ठिणग्या पडल्या व आग लागली. यात शेतकर्याचे लाख रूपयांचे नुकसान झाले आहे.
या बाबत मिळालेली माहिती अशी की,सोमवारी दि.१६ रोजी निलावडे येथील सर्वे नंबर ४२/२ मधील शिवारातुन गेलेल्या विधुत तारांचे वार्यामुळे घर्षण झाले.व आदीच्या ठिणग्या पडुन केळीच्या बागेला तसेच इतर झाडाना भर दुपारी आग लागली.बघता बघता आगीने रूद्र रूप धारण करून याभागातील सर्व पाण्याचे पाईप व इतर साहित्य जळून खाक झाले.
याघटनेची माहिती ट्रिब्यूनल मेंबर विनायक मुतगेकर याना मिळताच लागलीच निलावडे भागाचे तलाठी एच ए साबनावर,ग्राम पंचायतीचे सेक्रेटरी श्री तलवार याना पंचनामा करून लागलीच नुकसान भरपाई मिळवून देण्याची सुचना केली. लागलीच अधिकार्यानी घटना स्थळी जाऊन पंचनामा केला व लवकरात लव कर नुकसान भरपाई मिळवुन देण्याचे आश्वासन दिले.
# उन्हाळ्यात विधुत तारांचे घर्षण होऊन आगी लागण्याचे प्रकार !
तालुक्यात उन्हाळ्यामध्ये विधुत तारा प्रसरण पावुन लोबकळत असतात. त्यामुळे जोराच्या वार्यामुळे एकमेकावर विधुत तारांचे घर्षण होऊन आगी लागण्याचे प्रकार वेळोवेळी होतात. हेस्काँम खात्याने याकडे लक्ष देऊन लोंबकाळणार्या विधुत तारा सुरळीत कराव्या.अशी मागणी शेतकरी वर्गातुन होत आहे.
