असोग्याचे सुपूत्र,प्रसिध्द वकील, स्वामी विवेकानंद शिक्षण संस्थेचे चेअरमन,
खानापूर बीजेपीचे नूतन उपाध्यक्ष,अँडव्होकेट चेतन मणेरीकर यांच्यावाढदिवसा निमित्त थोडक्यात परिचय :
संदेश क्रांती न्यूज :
असोगा ( ता. खानापूर ) गावचे सुपुत्र, प्रसिद्ध वकील, स्वामी विवेकानंद शिक्षण संस्थेचे अध्यक्ष, खानापूर भारतीय जनता पार्टीचे नूतन उपाध्यक्ष आणि सामाजिक कार्यकर्ते अधिवक्ता चेतन अरुण मणेरीकर यांचा आज मंगळवारी दि.१७ मार्च रोजी वाढदिवस. होत आहे.
त्यांचे शालेय शिक्षण असोगा, खानापूर आणि सातारा येथे झाले. विद्यार्थी दशेत त्यांनी शिक्षण आणि क्रीडा प्रकारात उत्तम यश संपादीत केले. त्यांनी बेळगाव येथील GSS कॉलेजमधुन B.Sc. पदवी प्राप्त करून कायद्याची पदवी R.L.Law कॉलेज मधून घेतली. शाळा आणि कॉलेज मध्ये असताना NCC चे A, B आणि C सर्टिफिकेट त्यांनी मिळविले, असून नवी दिल्ली येथील प्रजासत्ताक दिनाच्या संचलनात त्यांची NCC एअरविंग कॅडेट म्हणून निवड झाली होती. कर्नाटक युनिव्हर्सिटी चे सिनेट मेंबर म्हणून त्यांची निवड झाली होती. कॉलेज मध्ये असताना क्रीडा सचिव, मॅगझिन सचिव म्हणून त्यांची निवड झाली होती. वकिली व्यवसाय करता करता त्यांनी पत्रकारितेचा डिप्लोमा प्रथम श्रेणीत पूर्ण केला. याशिवाय औद्योगिक क्षेत्राशी संबंधित डिप्लोमा इन इंडस्ट्रीयल रिलेशन्स आणि पर्सोनेल मॅनेजमेंट हा डिप्लोमा त्यांनी केला असून गेली २५ वर्षे वकिली व्यवसाय उत्तमरीत्या केला असून त्या माध्यमातून सामाजिक कार्यही केले आहे. खानापूर तालुक्यातील ऊसउत्पादकाना उत्तम दर मिळावा म्हणून त्यांनी आंदोलन उभारून त्यांना न्याय मिळवून दिला आहे. असोग्याचा दीर्घकाळ रेंगाळलेला मलप्रभा नदीवरील पुलाचा प्रश्न, भुयारी रेल्वे पुलाचा प्रश्न, असोगा बंधारा प्रश्न सोडवण्यामागे त्यांचा सिंहाचा वाटा आहे. खानापूर वकील संघटनेचे कार्यदर्शी म्हणून त्यांची निवड झाली होती. खानापूर येथे वरिष्ठ दिवाणी न्यायालय स्थापन करण्यामागे त्यांचा सिंहाचा वाटा आहे. दुर्गम भागातील नागरिकाना अथवा निरपराध युवकांना खोट्या केसेस मधून निर्दोष मुक्त करून त्यांना जलद न्याय मिळवून देण्यात श्री. चेतन अरुण मणेरीकर यशस्वी झाले आहेत. वकिली व्यवसाय करत असताना खानापूर तालुक्यातील दुर्गम भागातील जामगाव, कोंगळा, गवाळी आणि इतर अनेक गावांना प्रत्यक्ष भेट देऊन कायदा साक्षरता शिबिराच्या माध्यमातून त्यांनी सेवा कार्य केले आहे. स्वामी विवेकानंद शिक्षण संस्थेला मोठ्या प्रमाणावर देणग्या मिळवून देऊन शाळा आणि कॉलेज मध्ये विद्यार्थ्यांना दर्जेदार शिक्षण उपलब्ध करून देण्यासाठी ते सतत प्रयत्नशील आहेत. क्रीडा आणि कला क्षेत्रातील व्यक्तींना ते नेहमीच मदत करतात. ते राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे शालेय जीवनापासून स्वयंसेवक असून सर्व युवक संघाना, स्वयंसेवी संस्थांना सर्वतोपरी मदत करतात. “कोविड महामारी” काळात भटक्या विमुक्त लोकांना प्रत्यक्ष सहभागी होऊन त्यांनी जीवनोपयोगी वस्तूंचे वाटप केले होते. “सकाळ मिडिया प्रायव्हेट लिमिटेड” या वृत्तपत्र समूहाने त्यांच्या कार्याची दखल घेऊन २०२२ साली प्रसिद्ध अधिवक्ता श्री उज्वल निकम यांच्या हस्ते ” बेळगाव आयडॉल ” हा पुरस्कार त्यांना प्रदान करण्यात आला. त्यांना समाजाच्या प्रत्येक स्तरातील जनतेशी त्यांचे जिव्हाळ्याचे संबंध आहेत. बहुजन समाजातील ज्वलंत प्रश्नांची त्यांना उत्तम जाण असून ते सोडविण्यासाठी ते सतत प्रयत्नरत असतात. “नेशन फस्ट” म्हणजे “राष्ट्र सर्वोपरी” अशी विचारसरणी बाळगून सतत कार्यरत राहणे हा त्यांचा स्थायीभाव आहे. पुढील काळात कृषी पर्यटन, युवकांना सैन्य दलात तसेच इतर व्यवसायात यशस्वी होण्यासाठी लागणारे योग्य मार्गदर्शन उपलब्ध करून देऊन रोजगार निर्मिती करणे यासाठी ते प्रयत्नशील आहेत. खानापूर तालुक्याचा सर्वांगीण विकास व्हावा यासाठी सर्व राजकीय नेतेमंडळींशी ते उत्तम समन्वय साधतात. भारतीय जनता पार्टीच्या सर्व नेतेमंडळींशी, कार्यकर्त्यांशी, सामाजिक कार्यकर्त्यांशी त्यांचे उत्तम संबंध आहेत.

