१०.३० लाख रूपये किमतीचे मुकूट चोरीस!
संदेश क्रांती न्यूज :
खानापूर प्रतिनिधी
चापगाव ( ता. खानापूर )येथील ग्रामदैवत श्री फोंडेश्वर मंदिरात नव्याने बसविण्यात आलेल्या चांदीच्या मुकूटांची चोरी शनिवारी रात्री झाल्याची घटना घडली. हा प्रकार आज रविवारी सकाळी उघडकीस आला.
नुकताच शिव रात्रीच्या सनात श्रीफोंडेश्वर मंदिरात १० .३० लाख रूपये किमतीचे दोन चांदीचे मुकूट बसविण्यात आले होते.
शनिवारी दि.२८ रोजी मध्य रात्रीच्या सुमारास चोरट्यानी मंदिर चा समोरचा दरवाजा तोडुन पळवल्याचे दिसुन आले आहे.सदर घटना रविवारी पहाटे पाच वाजण्याच्या सुमारास दरवाजा उघडा असल्याचे काही नागरीकांच्या निदर्शनास आले.लागलीच नंदगड पोलिस स्थानकाला माहिती देण्यात आली.लागलीच पोलिसानी घटना स्थळी धाव घेतली.पोलिस या प्रकरणाचा तपास करत आहेत.
चापगाव गावचे ग्राम दैवत फोंडेश्वर देवस्थान आराध्य दावत आहे.या मंदिरात पूर्वापार एक पंचधातुचे मुकूट आहे. ते मुकुट केवळ दसर्याला व माघ पौर्णिमेच्या यात्रेला मंदिरात आणले जाते.व दगडाच्या मुर्तीला बसविण्यात येतो.अलिकडेच शिव रात्री सनाला या मंदिरात चांदीचे मुकुट बसविण्यात आले होते.केवळ पंदरा दिवसातच चांदीच्या मुकूटांची चोरी झाल्याने चापगाव गावावर संकट ओढावले आहे.
याचोरीची कसुन चौकशी व्हावी व चोरट्याना पकडून जेरबंद करावे.अशी मागणी चापगांव ग्रामस्थातुन होत आहे.या घट ने ची नोंद नंदगड पोलिसस्थानकात झाली असुन पोलिस निरीक्षक व त्यांचे सहकारी पुढील तपास करत आहेत.
