#आर.एफ.ऒ.वाय. पी.तेज ,सय्यदसाब नदाफ याची घटनास्थळी मदत!
संदेश क्रांती न्यूज :
खानापूर प्रतिनिधी
खानापूर तालुक्याच्या जंगल भागातील खोटे गावातील प्राण्याकडुन नेहमीच हल्ले होत असतात.कधी गवी रेड्यांचे बल्ले तर कधी अस्वलांचे हल्ले ,कधी कोल्ह्यांचे हल्ले सुरूच असतात.
असे असतानाच मंगळवारी दि.२० जानेवारी रोजी सकाळच्यावेळी खानापूर तालुक्याच्या पास्टोली गावच्या महिलेवर रान डुक्कराने हल्ला करून गंभीर जखमी झाल्याची घटना घडली.
या बाबत घटनास्थळावरून मिळालेली माहिती अशी की, पास्टोली गावच्या महिला अश्विनी श्रीकांत पाटील व इतर दोन महिला शेतवाडीत वायंगण (उन्हाळी भात पिक ) भात पिकाच्या लागवडीसाठी शेतातील रोपे आणण्यासाठी रस्त्यावरून जात असताना, दोन महिला रस्त्यावरून पुढे जात होते या , तर अश्विनी पाटील त्याच्या मागुन जात
असतानाच जंगलातुन अचानक दोन रान डुक्करे बाहेर आली.त्यातील एका रान डुक्कराने अश्विनी पाटील यांच्यावर जोराचा हल्ला केला.त्या हल्ल्यात त्याच्या गुडघ्याला,कंबरेला, व पायाला गंभीर जखम. झाली.एवढेच नव्हेतर त्याच्या गुडघ्याला रानडुक्कराच्या सुळ्याने हाडवर गंभीर जखम झाली.
या घटनेची माहिती मिळताच आर एफ ओ वाय पी तेज व आर एफ ओ सय्यदसाब नदाफ आदीनी लागलीच घटनास्थळी वाहनासह सहकार्याना पाठवून देऊन सदर जखमी महिले ला उपचारासाठी खानापूर सरकारी दवाखाण्यात उपचारासाठी दाखल केले.
लागलीच प्राथमिक उपचार करून पुढील उपचारासाठी त्याना बेळगावला पाठविले.

