#गुरूजनांचा सत्कार!
संदेश क्रांती न्यूज:
खानापूर प्रतिनिधी
गर्लगुंजी ( ता.खानापूर) येथील ज्योतिराव फुले विद्यालयाचे सन १९८३-८४ बॅचच्या इयत्ता दहावीच्या माजी विद्यार्थ्याचा स्नेह मेळावा,अर्थात एक दिवस गुरूजनांच्या सहवासात व गुरूजनांचा सत्कार असा संयुक्त कार्यक्रम आज रविवारी दि १८ जानेवारी रोजी सकाळी ठीक १० वाजता गर्लगुंजी सरकारी मराठी मुलांच्या शाळेत आयोजित करण्यात आला आहे.
या कार्यक्रमाला प्राथमिक शाळेचे मा जी शिक्षक व हायस्कूलचे माजी शिक्षक उपस्थित राहणार आहेत.
गेल्या ४१ वर्षानंतर एकत्रित येऊन मा जी शिक्षकाकडुन आशीर्वाद आणि शुभेच्या घेण्यासाठी माजी विद्यार्थी उत्साहित झाले.
सन १९८३-८४ सालातील काही मा जी विद्यार्थी निवृत्तीच्या उंबरठ्यावर आहेत.तेव्हा मा जी शिक्षकाच्या सहवासात एक दिवस घालवू इच्छितात.
