संदेश क्रांती न्यूज :
खानापूर प्रतिनिधी
खानापूर शहरातील हेस्काॅम कार्यालयात प्रत्येक महिण्याच्या तीसर्या शनिवारी ग्राहक मेळाव्याचे आयोजन करण्यात येते.त्यानिमित्त आज शनिवारी दि.१७ जानेवारी रोजी सकाळी ११.०० ते दुपारी १.३० वाजेपर्यत तालुका स्तरीय ग्राहक मेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे.तरी वीज संबधित कोणत्याही तक्रारी असतील तर ग्राहक मेळाव्यात उपस्थित राहुन तक्रारी मांडव्यात. असे आवाहन हेस्काॅम कार्यालयाचे कार्यकारी अभियंत्यानी केले आहे.


