संदेश क्रांती न्यूज :
खानापूर प्रतिनिधी
प्रत्येक माणसाला पावणारा देव पंढरीची पांडुरंग,अशा पांडुरंगाच्या सप्ताहाला ओलमणी ( ता. खानापूर ) गावच्या पांडुरंग सप्ताहाला १२५ वर्षाचा इतिहास आहे.याबद्दल वारकरी मंडळाचे अभिनंदन करतो.
असे विचार खानापूर वकिल संघटनेचे अध्यक्ष ईश्वर घाडी यानी ओलमणी येथील पांडुरंग सप्ताहाच्या सांगता समारोह प्रसंगी बोलताना व्यक्त केले.
यावेळी पुढे बोलताना ते म्हणाले की,अशा वारकार्याचा वसा असलेल्या आलमणी गावाला समुदाय भवनाच्या इमारती साठी सरकारी दरबारी निधी मंजुर करून देण्याची ग्वाही दिली.
यावेळी व्यासपीठावर पी एल डी बॅकेचे चेअरमन मुरलीधर पाटील, सूर्यकांत साबळे,मारूती पवार,महेश साबऴे,किरण साबळे, जोतिबा नावलकर, शाहु राऊत,दिनकर राऊत,विनोद देसाई, पत्रकार हणमंत जगताप, प्रल्हाद मादार आदी उपस्थित होते.
या वेळी बोलताना पी एल डी बॅकेचे चेअरमन मुरलीधर पाटील म्हणाले कि,पांडुरग सप्ताहाची परंपरा ओलमणी गावाने कायम ठेवली आहे.याबद्दल गावचे कौतुक करावे तेवढे कमीच आहे. तेव्हा ही परंपरा कायम ठेवा. यामुळे गावात एकोपा, भक्ती, शांतता सुख ,समाधान पसरते.अशीच परंपरा कायम ठेवा. असे मत व्यक्त केले.


