#स्वच्छता कामगाराना शाल,स्विटची भेट!
संदेश क्रांती न्यूज :
खानापूर प्रतिनिधी
खानापूर शहरातील रहिवाशी तसेच खानापूर भाजपचे माजी शहराध्यक्ष व भाजप युवा नेते सुनिल नायक यांनी वाढदिवसाचे औचित्य साधुन खानापूर नगरपंचायतीच्या स्वच्छता कामगाराना शुक्रवारी दि. १६ रोजी शाल , स्विट देऊन त्याचा सत्कार करण्यात आला.
यावेळी खानापूर भाजपचे माजी शहराध्यक्ष व भाजप नेते सुनिल नायक, खानापूर तालुका भाजप माजी अध्यक्ष संजय कुबल, भाजप युवा नेते पंडित ओगले, भाजप ने ते राजेंद्र रायका, सुनिल मा से कर, रवी बडगेर, रवी पाटील,नगर सेवक नारायण ओगले,राजू जांबोटकर,तसेच चीफ आँफिसर संतोष कुरबेट, प्रेमानंद नाईक आदी उपस्थित होते.
प्रारंभी भाजप युवा नेते पंडित ओगले यानी प्रास्ताविक करून वाढदिवसानिमित्त सुनिल नायक यांचा परिचय करून दिला.व वाढदिवसाच्या शुभेच्छा देऊ केल्या.
या वेळी माजी तालुका भाजपा अध्यक्ष संजय कुबल यानी सुनिल नायक याना शुभेच्छा देताना म्हणाले की,सुनिल नायक हे भाजप जुने कार्यकर्ते त्यानी भाजपचे शहर अध्यक्ष असताना पक्षाच्या प्रगती साठी खूप धडपड केली आहे.त्यानी आपल्या वाढदिवसानिमित्त अनेक कार्यक्रम राबविले आहेत. तर या वर्षा खानापूर नगर पंचायती च्या स्वच्छता कामगाराना शाल, स्विट भेट देऊन आपला वाढदिवस साजरा केला.
कार्यक्रमाला भाजपचे पदाधिकारी, नगरपंचाय़तीचे कर्मचारी,मोठ्या संख्येने उपस्थित होते.
