# कुमिते ( फाईट ) प्रकारात रौप्यपदक !
संदेश क्रांती न्यूज :
खानापूर प्रतिनिधी
खानापूर शहरातील निंगापूर गल्लीतील कराटेपटू कुमारी प्रांजली ईश्वर पाटील हिने इंटर नॅशनल चॅम्पियनशिप डेराडुन ये थे शाॅटनाॅन कराटे डू स्पोर्टस असोसिएशन इंडिया यांच्यावतीने आयोजित करण्यात आलेल्या कराटे स्पर्धेत भाग घेऊन कुमित(फाईट ) प्रकारात रौप्यपदकासह यश संपादन केले.
यानिमित खानापूर नगरपंचायतीच्या नगराध्यक्षा सौ.मिनाक्षी प्रकाश बैलूरकर व नगरसेवक प्रकाश बैलूरकर यांच्यावतीने शाल, पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला.
या कराटे स्पर्धेत नेपाळ, भूतान ,श्रीलंका स्वीडन या देशासह १२०० कराटे स्पर्धकानी भाग घेतला.
कराटे स्पर्धेत रौप्यपदक प्राप्त केलेल्या प्रांजली ईश्वर पाटील हिचे खानापूर तालुक्यातुन अभिनंदन होत आहे.


