संदेश क्रांती न्यूज :
खानापूर प्रतिनिधी
परमपूज्य गुरुदेव 108 श्री समंतभद्र मुनी महाराज यांच्या तत्त्वानुसार अकोळ या ठिकाणी गेली सुमारे 40 वर्षे श्री बाहुबली विद्यापीठ बाहुबली संचलित श्री पार्श्वमती विद्यालयच्या माध्यमातून शैक्षणिक कार्य होत आहे . पालकांच्या मागणीनुसार चालू वर्षीपासून प्रशालेत मुलांनाही प्रवेश सुरू केल्याने इयत्ता आठवी, नववी व दहावी मध्ये मुली बरोबरच मुलांचाही प्रवेश लक्षणीय आहे . उत्तम संस्कार हेच खरे शिक्षण ,या तत्त्वानुसार श्री पार्श्वमती विद्यालय अकोळ या ठिकाणी अध्यापन होत आहे .
असे विचार श्री पार्श्वनाथ ब्रह्माचार्य आश्रम स्तवनीधीचे उपाध्यक्ष माननीय श्री रामगोंडा रायगोंडा पाटील यांनी व्यक्त केले . ते श्री पार्श्वमती विद्यालय अकोळ येथे श्री समंतभद्र महाराजांच्या 134 व्या जयंती निमित्त आयोजित कार्यक्रमात अध्यक्ष या नात्याने बोलत होते .
प्रास्ताविक व स्वागत प्रभारी मुख्याध्यापक जे . एस . पाटील यांनी केले तर आभार प्रदर्शन एस. डी . खोत यांनी केले . सूत्रसंचालन सौ पी . बी . कळंत्रे यांनी केले .
यावेळी विद्यार्थ्यांनी रेखाटलेल्या सर्व विषयांच्या रांगोळी प्रदर्शनाचे उपस्थित मान्यवरानी उद्घाटन करून निरीक्षण केले आणि सर्व सहभागी विद्यार्थी व विद्यार्थिनींचे कौतुक केले . माजी मुख्याध्यापक आर डी टोपरे यांनी गुणावुक्रमे प्रथम क्रमांकाच्या रांगोळीस 701 रुपये, द्वितीय 501 रुपये व तृतीय 301 रुपये अशी पारितोषिके दिली . कार्यक्रमास माजी मुख्याध्यापक आर ए खोत , माजी मुख्याध्यापक आर डी टोपरे, माजी मुख्याध्यापक बी .जी. खोत सर, सौ टोपरे ,एस एस मगदूम, एस ए कबुरे ,टी ए देसाई ,शिक्षक ,शिक्षकेतर कर्मचारी, विद्यार्थी व विद्यार्थिनी उपस्थित होत्या .


