#पिकाचे प्रचंड नुकसान, खळ्यातील भात, भातगंजी, उभे पिकही फस्त!
#करंजाळ भालके रस्त्याकडेला हत्तीचे दर्शन
संदेश क्रांती न्यूज :
खानापूर प्रतिनिधी
गुंजी ( ता.खानापूर ) परिसरात भर दिवसा हत्तीचा संचार सुरू आहे. महिन्याभरापासून हत्तींचा उपद्रव सुरूच असून दररोज वेगवेगळ्या शिवारात शिरून शेतकऱ्यांच्या भात पिकाचे नुकसान नित्याचेच ठरलेले आहे. त्यामुळे येथील शेतकरी वर्ग पुरता अहवाल दिल झाला हत्तीच्या या उपद्रवाला पुरता कंटाळला आहे. मात्र आरण्य खात्याने हत्ती हटाव मोहीम अद्यापही हाती न घेतल्याने शेतकऱ्यातून तीव्र नाराजीचा सूर उमटत आहे.
#हत्तीचा गुंजी परिसरात भर दिवसा संचार!
गेल्या दोन दिवसापासुन गुंजी परिसरात भर दिवसा दोन हत्ती व एक पिल्लू शिवारात फिरताना दिसत आहे.नागरीकाना याची भिती वाटत आहे.
अजुन शिवारात भात कापायची आहेत.
त्यामुळे शेतकर्याना हत्तीच्या भितीने दिवसासुध्दा शिवारात जाऊन भात कापणे म्हणजे मोठे संकट झाले आहे.
तेव्हा हत्ती शिवारात केव्हा दत्त होतील याचा नेम नाही.
#हत्तींचीधास्ती कायम!
अध्यापही या भागात हत्तींनी ठाण मांडल्याने त्यांची धास्ती कायम असून शेतकरी वर्गात चिंतेचे वातावरण पसरले आहे. कारण या भागातील अद्यापही जवळ जवळ २५ टक्के भात कापणी शिल्लक असून काही जण मजुरांच्या तुटवड्यामुळे तर काहीजण भात परिपक्व होण्यासाठी भात कापणी साठी उशीर करत आहेत. अनेक शेतकऱ्यांनी तर अर्ध पक्व भात पीक कापून घरी आणण्याचा सपाटा सुरू ठेवला आहे. शेतकरी वर्ग हत्तीच्या या उपद्रवाला पुरता कंटाळला आहे. मात्र आरण्य खात्याने हत्ती हटाव मोहीम अद्यापही हाती न घेतल्याने शेतकऱ्यातून तीव्र नाराजीचा सूर उमटत आहे.
# भालके करंजाळ रस्त्याच्या कडेला हत्तीचे दर्शन,काहीवेळ बस थांबली!
गुंजी परीसरात हत्तीचा धुमाकुळ सुरूच असताना शनिवारी भालके कंरजाळ रस्त्याच्या कडेलाच हत्तीनी भर दिवसा हजेरी लावली.यावेळी बस सुध्दा काही वेळ थांबली.,त्यामुळे बस मधील प्रवाशाना भिती वाटली. काही वेळाने हत्ती माघारी वळले. ,त्यामुळे सर्वाचा जीव भांड्यात पडला.
अशा प्र कारा ने गुंजीभागात भितीचे वातावरण असल्याची माहिती युवा कार्यकर्ते पंकज कुट्रे यानी बोलताना सांगीतले.
