संदेश क्रांती न्यूज :
खानापूर प्रतिनिधी
खानापूर तालुक्यात लंपी रोगाने थैमान घातले असुन पशु खात्याच्या दुर्लक्षपणामुळे भुरूणकी ( ता. खानापूर) येथील. गरीब शेतकरी श्रीकांत हणमंत बेकवाडकर याच्या ५० हजार रूपये किमतीच्या बैलाचा लंपी रोगाने नुकताच मृत्यू झाला असुन दुसरा बैल ही लंबी रोगाने त्रस्त झाला आहे.
गेल्या अनेक दिवसापासुन बैलाला लंपी रोगाची लागन झाली असुन पशु खात्याकडुन म्हणावा तसा उपचार झाला नाही. उपचार दरम्यान नुकताच त्याचा मृत्यू झाला. त्यामुळे गरीब शेतकर्याला ५० हजार रूपयाचा आर्थिक. भुर्दड बसला आहे. तर दुसरा बैल ही लंपी रो गाने त्रस्त आहे. पशु खात्याकडुन उपचाराचा म्हणावा तसा प्रतिसात दिला जात नाही.त्यामुळे शेतकरी हवाल दिल झाला आहे.
लंपी रोगाने मृत्य पावलेल्या बैलाची तपसणी करून रिपोर्ट पाठ वि ला आहे. यावेळी पशु खात्याच्या वैद्याधिकारी मनोहर दादमी तसेच इतर कर्मचारी ग्राम पंचायतीचे मा जी अध्यक्ष महेश पाटील व शेतकरी उपस्थित होते.
या वेळी गरीब शेतकर्याला सरकारने आर्थिक मदत करून द्यावी.अशी मागणी भुरूणकी गावच्या शेतकर्यातुन होत आहे.
