# हलकर्णी शाळेत बालक-पालक, शिक्षक मेळावा उत्साहात!
संदेश क्रांती न्यूज:
खानापूर प्रतिनिधी
आजच्या वैज्ञानिक युगात शिक्षणाला अधिक महत्त्व आहे.आजचे बालक देशाचे आधारस्तंभ घडू शकतात. यासाठी लहानपणातच बालकांना योग्य शिक्षण उत्तम आरोग्य यासह संस्कार घडवण्यासाठी पालकांनी प्रयत्न केले पाहिजेत. मातीचा गोळा बनवण्यासाठी शिक्षक अथक परिसरात घेतात. शाळेत मुलांना उत्तम ज्ञानार्जनासह संस्कार घडवण्याचे कार्य शिक्षक करतात. याला पालकांची मौलाची साथ लागते. असे विचार शाळा व्यवस्थापन कमिटीचे अध्यक्ष कृष्णा चौगुले यांनी व्यक्त केले.
हलकर्णी (ता. खानापुर) येथील सरकारी मराठी हायर प्राथमिक शाळेत बाल दिनाचे अवचित साधून बालक पालक मेळावा आयोजित करण्यात आला होता. या मेळाव्यात ते अध्यक्षस्थानावरून बोलत होते.
यावेळी ते म्हणाले की,भारताचे पहिले पंतप्रधान स्वर्गीय पंडित जवाहरलाल नेहरू यांचा आज जन्मदिन यानिमित्ताने आज बालदिनाचे आयोजन संपूर्ण देशभरात केले जाते. बालदिन हा साजरा करण्यामागे नेहरूजींचे योगदान महत्त्वाचे आहे. संपूर्ण देशातील बालक भविष्यात देशाचे आधारस्तंभ राहू शकतात. यासाठी या बालकांना उर्जितवस्था व उत्तेजन देणे काळाची गरज आहे. यासाठी हा उत्सव साजरा केला जातो.
हलकर्णी शाळेत केला जाणारा हा बालदिन शिवाय बालक पालक शिक्षक मेळावा हा एक प्रेरणादायी ठरावा असे विचार त्यांनी व्यक्त केले. यावेळी बोलताना ग्रामपंचायतीचे विकास अधिकारी पाणीवाले म्हणाल्या, आजच्या पिढीत व्यसनाधीनता वाढली आहे. व्यसनमुक्त अभियान राबवण्यासाठी शाळेमध्ये संस्काराचे धडे दिले पाहिजेत. शिवाय बालविवाह संस्कृती नष्ट करून समाजामध्ये आदर्श राखण्यासाठी प्रत्येकाने झटावे आई-वडिलांचा आदर राखत मुलींनी समाजात उज्वल भविष्य संपादन करण्यासाठी उत्तम ज्ञानाबरोबर आदर्श राखावा असे विचार मांडले.
यावेळी शाळा व्यवस्थापन कमिटीच्या वतीने भविष्यात शाळेच्या प्रगती बरोबर आधुनिक शिक्षण पद्धत देण्यासाठी तसेच नवीन इमारत उभारणीसाठी शासन दरबारी प्रयत्न करून शाळेची उन्नती साधण्याचा निर्णय घेण्यात आला.
यावेळी शाळेचे मुख्याध्यापक के.एम.बेलगामी यांनी उपस्थितांचे स्वागत करून शाळेच्या प्रगती विषयी माहिती दिली. यावेळी व्यासपीठावर शाळा व्यवस्थापन कमिटीचे उपाध्यक्षा वैष्णवी पाटील तसेच पालक यल्लापा बाळेकुंद्री, रामचंद्र पाटील अशा कार्यकर्ते तसेच गावातील जेष्ठ नागरिक व शिक्षक वृंद उपस्थित होता.
