#खानापूरचा विकास हेच आमचे ध्येय म्हणणाऱ्यांना काय म्हणावे!
संदेश क्रांती न्यूज:
खानापूर प्रतिनिधी
खानापूर तालुका हा अतिशय दुर्गम व मागासलेल्या तालुका आहे. त्याचबरोबर दुसरीकडे खानापूर शहरचा दिवसेंदिवस विस्तार वाढत आहे. मात्र शहराचा विकास होत नाही.एकीकडे खानापूरचा विकास हेच आमचे ध्येय म्हणणाऱ्यांना खानापूर शहराच्या उपनगरातील विद्यानगरात रस्ते, गटारी याचा विसर पडल्याने विद्यानगरातील रस्त्यावर पाण्याची डबके तसेच रस्त्याच्या कडेला झुडपे वाढली आहेत याचा विसर पडला आहे.
खानापूर शहराच्या उपनगरातीलविद्यानगरात गेल्या कित्येक वर्षापासून गटारी नाहीत. तसेच रस्ता पण नाही. त्यामुळे विद्यानगरात रस्त्यावर जागोजागी पाण्याची तळी साचली आहेत. रस्त्याच्या कडेला झुडपे वाढली आहेत.
या भागातील नागरिकांना रस्त्यावरून येजा करणे कठीण होत आहे. शाळकरी मुलांना तसेच वयोवृद्ध नागरिकांना रस्त्यावरच्या डबक्यातून पायवाट काढत येताना प्रचंड त्रास होत आहे.
याकडे तालुकाचे लोकप्रतिनिधी नगरपंचायतीचे चीफ ऑफिसर तसेच नगरसेवक डोळेझाक करून बसले आहेत. त्यामुळे खानापूर तालुक्याचा विकास आज आमचा ध्यास हे म्हणणे कितपत योग्य आहे असे या भागातील जनतेला वाटत आहे.
नगरपंचायत प्रत्येक कुटुंबाकडून टॅक्स जमा करते हा पैसा जातोय कुठे असा सवाल रहिवासी करत आहेत. खानापूर शहराच्या विकासासाठी निधी मंजूर होतो की नाही जर निधी मंजूर होत असेल तर विद्यानगरातील रस्त्यांची ही अवस्था का होते.असा सवाल या विद्यानगरातील नागरिकांतून होत आहे.
तेव्हा संबंधित खात्याच्या नगरपंचायतीच्या चीफ ऑफिसरनी , नगरसेवकांनी तसेच लोकप्रतिनिधी याकडे लक्ष देऊन विद्यानगरातील रस्ते गटारींची त्वरित दुरुस्ती करावी व नागरिकांची सोय करावी. अशी मागणी होत आहे.


