संदेश क्रांती न्यूज
खानापूर प्रतिनिधी
माडीगुंजी (ता. खानापूर) येथे झोपडीला आग लागल्याने झोपडीतील संसर्ग साहित्य आगीच्या भस्मसात पडली.ही घटना रविवार दिनांक 26 रोजी झाले.त्यामुळे येथील वानरमारी समाजातील बाबू पोवार यांचे कुटुंब वाऱ्यावर पडले आहे.
याबाबत मिळालेली माहिती अशी की, बाबू पोवार आपल्या कुटुंबासह कामासाठी बाहेर गेल्यामुळे कोणतीही जीवित हानी झाली नाही.मात्र संसार उपयोगी साहित्य जळून खाक झाले त्यामुळे कुटुंब आर्थिक संकटात सापडले आहे.
बाबू पवार हे समाजातील असून गेल्या कित्येक वर्षापासून ते या ठिकाणी राहत आहेत गावात काम करून उदरनिर्वाह करत होते रविवारी सुद्धा कामाला गेले होते परंतु अचानक त्यांच्या झोपडीला आग लागली त्या आगीत झोपडी पूर्णपणे जळून खाक झाली आगआग लागल्याची माहिती मिळताच डॉक्टर आंबेडकर ब्रिगेडचे राम मादार संजय चोपडे पुंडलिक नांदोडकर आदींच्या साह्याने आग आटोक्यात आणण्यात आली. त्यामुळे शेजारी असलेल्या झोपड्या बचावल्या. संबंधित बाबू पोवार यांना सरकारकडून आर्थिक मदत मिळावी अशी मागणी ग्रामस्थांनी केली आहे
