#वरकड पाटे इथे पारायण सोहळ्याला प्रारंभ!
संदेश क्रांती न्यूज:
खानापूर प्रतिनिधी
आजच्या युगात मनशांती मिळायची असेल तर पारायण, किर्तन झाले पाहिजे. तरच मनाला शांती मिळेल. असे विचार खानापूर तालुका ब्लॉक काँग्रेस अध्यक्ष अँड ईश्वर घाडी यांनी गुरुवारी दिनांक 23 रोजी वारकड पाटे येथे पारायण सोहळ्याच्या शुभारंभ प्रसंगी बोलताना आपले विचार व्यक्त केले.
यावेळी बोलताना ते म्हणाले कीर्तनकार व वारकरी यांच्यासाठी सरकार दरबारी मानदान मिळवून देण्यासाठी अथक प्रयत्न झाले पाहिजे. कारण संतांच्या सहवासाने समाजात चांगली भक्ती व शांतता प्राप्त होते आणि त्यामुळे सुखी संसाराचा गाडा चालतो. संतांच्या सहवासाने माणूस व्यसनापासून दूर जातो आणि चांगले जीवन जगतो असे मत व्यक्त केले
प्रारंभी सत्यनारायण पूजेने पारायण सोहळ्याचा प्रारंभ झाला. यावेळी ह भ प विठ्ठल महाराज व गोपाळ महाराज पंढरपूर यांच्या सानिध्यात सुरू असलेल्या पारायण सोहळ्याला भजनी मंडळाच्या महिला मोठ्या संख्येने उपस्थित होत्या.
तसेच यावेळी वारकरी मंडळी, कीर्तनकार, गावचे नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते

