“इंडियन कराटे क्लब बेळगावच्या वतीने जिल्हा क्रिडा संघटनेच्या चार विद्यार्थ्यांना ब्लॅकबेल्ट प्रदान
#१४५ कलर बेल्ट कराटे पट्टू चा सहभाग!
संदेश क्रांती न्यूज:
खानापूर प्रतिनिधी
बेळगाव येथील मनोप्रभा मंगल कार्यालय मंडोळी रोड भवानी नगर येथे नुकताच
कराटेची बेल्ट परीक्षा पार पडली. या परीक्षेत एकूण १४५ कलर बेल्ट कराटेपटू सहभागी झाले होते.
यामध्ये टॉप चार ब्लॅकबेल्ट विद्यार्थी सी.क्रीतीकाश्री ,अनिरुद्ध कुलकर्णी , अनुजा देशपांडे आणि इस्राईल यद्दनपूडी
या चारही खेळाडूंनी राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय कराटे स्पर्धेत सहभागी होऊन विविध ठिकाणी पदके मिळविली.
तरी आज या कठीण परिश्रमातून या खेळाडूना इंडियन कराटे क्लब व बेळगाव जिल्हा स्पोर्ट्स कराटे असोसिएशनचे अध्यक्ष गजेंद्र काकतीकर यांच्या हस्ते ब्लॅकबेल्ट ,प्रमाणपत्र आणि स्मृतीचिन्ह देऊन गौरविण्यात आले.
तसेच त्यांच्या पालकांना सुद्धा शाल, श्रीफळ व पुष्पगुच्छ देऊन सन्मानित करण्यात आले.
वरील चारही ब्लॅकबेल्ट खेळाडूना कराटे प्रशिक्षक हरीष सोनार यांचे प्रशिक्षण लाभत आहे.
कार्यक्रमाला प्रमुख अतिथी म्हणून . सुनील आपटेकर (बॉडी बिल्डर मिस्टर इंडिया, मी. आशिया आणि एकलव्य पुरस्कार प्राप्तकर्ता) ,डॉ. डी.ए नाडगौडा (समर्थ इंग्लिश मिडीयम शाळेचे चेअरमन) , सारंग रागोचे ( नगरसेवक, जी.आर गंटेन्नवर( माजी पोलीस अधिकारी , वेंकटेश ताशीलदार (बॉडी बिल्डर ज्युनियर मी. इंडिया, मी. साऊथ आशिया)
उपस्थित होते.
तर हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी इंडियन कराटे क्लबच्या लेडी चीफ इंस्ट्रक्टर हेमलता ग. काकतीकर व प्रशिक्षक प्रभाकर किल्लेकर, विजय सुतार, परशुराम काकती, विठ्ठल भोजगार निलेश गुरखा, विनायक दंडकर, ,परशराम नेकनार,
रतिक लाड , किरण गडकर आणि सिद्दिका देवलापूर यांनी विशेष परिश्रम घेतले.

