#खानापूर तालुका ब्लॉक काँग्रेस अध्यक्ष अँड ईश्वर घाडी यांनी फीत कापून केले उदघाटन!
संदेश क्रांती न्यूज:
खानापूर प्रतिनिधी
हलकर्णी (ता. खानापूर ) येथील कॉन्ट्रॅक्टर दंडगल ग्रुप यांच्या गोवा जांबोटी रोडवरील कुसमाळी जवळ नवीन उभारण्यात आलेल्या सी आर 7 गार्डन रेस्टॉरंटचे शानदार उद्घाटन गुरुवार दिनांक 23 रोजी पार पडले.
यावेळी खानापूर तालुका ब्लॉक कांग्रेस अध्यक्ष अँड. ईश्वर घाडी, डॉक्टर मनोहर चव्हाण यांच्या हस्ते फित कापून करण्यात आले.
यावेळी बोलताना खानापूर तालुका ब्लॉक काँग्रेस अध्यक्ष अँड. ईश्वर घाडी म्हणाले की अलीकडे रेस्टॉरंट सारख्या व्यवसायला चांगला प्रतिसाद मिळत आहे. याशिवाय चांगल्या प्रकारचे चविष्ट जेवण सर्वांना आवडीचे होत आहे. यासाठी ए.एस. दंडगल ग्रुप यांच्या वतीने गोवा जांबोटी रोडवरील कुसमाळी जवळ सी आर 7 गार्डन रेस्टॉरंट उभारूण जनतेची सेवा करण्याचे व्रत हाती घेतले आहे. त्यांना या धंद्यात भरघोस यश मिळावे. आणि त्यांची भरभराट व्हावी .अशी सदिच्छा उद्घाटन वेळी व्यक्त केली.
प्रारंभी पूजनाने कार्यक्रमाची सुरुवात झाली.
यावेळी कॉन्ट्रॅक्टर सुरेश दंडगल यांनी उपस्थिताचे स्वागत केले. तर खानापूर तालुका ब्लॉक काँग्रेस अध्यक्ष अँड ईश्वर घाडी यांनी दंडगल दंपत्याचे शाल,पुष्पहार घालून सत्कार केला व त्यांच्या कार्याला शुभेच्छा दिल्या.
कार्यक्रमाला खानापूर तालुका ब्लॉक काँग्रेस अध्यक्ष अँड ईश्वर घाडी,शहर काँग्रेस अध्यक्ष महांतेश राऊत, संजय सुंठकर, डॉक्टर मनोहर चव्हाण, कृष्ण पवार, ग्रामपंचायत सदस्या सौ सखुबाई पाटील, संदीप घुंगरटकर, सुशांत दंडगल, राजेश पाटील , निवृत्त हेस्कॉमचे अधिकारी शिवाजी हळकुंडे याशिवाय दंडगल, पवार, गुंजीकर, बंडीवंड्डर परिवार मोठ्या संख्येने उपस्थित होते.
आभार काँग्रेसच्या नेत्या सौ. अनिता दंडगल यांनी मानले.


