संदेश क्रांती न्यूज
खानापूर प्रतिनिधी
गर्लगुंजी (ता खानापूर) गावचे सुपुत्र व यंदाचा तालुका आदर्श शिक्षक पुरस्कार मिळविलेले पी.डी. कुंभार यांचा गर्ल गुंजी येथील जिजाऊ मल्टीपर्पज को-ऑपरेटिव्ह सोसायटीच्या वतीने सत्कार सोहळा नुकताच पार पडला.
जिजाऊ मल्टीपर्पज सोसायटीच्या वार्षिक सर्वसाधारण सभेत तालुका आदर्श शिक्षक पुरस्कार प्राप्त पी डी कुंभार यांचा सोसायटीचे चेअरमन शांताराम मे लगे यांच्या हस्ते शाल, श्रीफळ व स्मृतिचिन्ह व पुष्पहार घालून सत्कार करण्यात आला.
यावेळी सोसायटीचे चेअरमन शांताराम मेलगे, गर्लगुंजी भीमसेना अध्यक्ष रमेश कोलकार, संचालक यल्लाप्पा व्हळाणाचे, भरत गोरे, गंगाराम वडे बैल कर, अरुण मेलगे, दीपक चौगुले, सुहास कदम आधी उपस्थित होते.
यावेळी प्रास्ताविक शांताराम यांनी केले. आभार सुहास कदम यांनी मानले.
