कोण लक्ष देणार!
संदेश क्रांती न्यूज:
खानापूर प्रतिनिधी
खानापूर शहरातील जांबोटी क्राॅसवरील पारीश्वाड रोड बसस्थानकाच्या प्रवेशव्दारावरच मोठ मोठे खड्डे पडले आहेत.याकडे केएसआरटीसीचे लक्ष नाही,संबधीत खात्याच्या अधिकार्याचे लक्ष नाही की तालुक्याच्या आमदाराचे लक्ष नाही.
अशाने हा खड्डा कुणाचा तरी बळी घेतल्यानंतर सबंधीताना जाग येणार का? असा सवाल तालुक्यातील जनतेतुन व प्रवाशी वर्गातुन होताना दिसत आहे.
