#दीड लाखाचे नुकसान!
#तालुक्यात भितीचे वातावरण पशु खाते सुस्त!
संदेश क्रांती न्यूज :
खानापूर प्रतिनिधी
खानापूर तालुक्यात खेडोपाडी विविध रोगाच्या साथीने दुबत्या जनावराचा मृत्यू होत आहे.त्यामुळे गरिब शेतकर्याचे आर्थिक नुकसान होत आहे.
नुकताच हलशी ( ता.खानापूर ) येथील शेतकरी महादेव निंगापा बावकर यांच्या तीन म्हशी एकाच आठवड्यात टलेरिया नावाच्या साथीच्या रोगाने दगावल्याने त्यांचे जवळपास दीड लाखाचे आर्थिक नुकासन झाले आहे.
गरीब शेतकरी महादेव बावकर यानी तीन दुधाच्या म्हशी पाळल्या होत्या. एकाच आठवड्यात एकापाठोपाठ एक अशा तीन म्हशीचा टलेरीया नावाच्या रोगाने मृत्यू झाला.
म्हशीना वाचविण्यासाठी उपचार व्हावे म्हणून त्यानी बेळगाव तसेच धारवाड येथून डाॅक्टर मागवले होते. मात्र उपाराचे प्रयत्न होऊन सुध्दा म्हशी जगु शकल्या नाहीत. त्यामुळे महादेव बावकर यांचे दीड लाखाचे नुकसान झाले.
यावेळी काॅग्रेस नेते श्री ईश्वर बोबाटे यानी शेतकरी महादेव बावकर यांचे मोठे आर्थिक नुकसान झाले आहे.त्याना आर्थिक मदत व्हावी. अशी मागणी करण्यात आली आहे.