#पहिल्यांदाचा मोठा निधी!
संदेश क्रांती न्यूज :
खानापूर प्रतिनिधी
खानापूर तालुक्यातील पी.के.पी.एस. सोसायट्याच्या गोडावुनसाठी आमदार विठ्ठलराव हलगेकर यांच्या पर्यत्नातुन १० कोटी रूपयाचा निधी मंजुर करण्यात आला.
ऐन डी सी सी बॅकेच्या निवडणुकीच्या तोंडावर १० कोटी रूपयाचा निधी मंजुर करून प्रत्येक पी.के. पी.एस. सोसायटीला २५ लाख रूपये मंजुर करण्यात आले.
खानापूर तालुक्यात जवळ पास ५५ पी.के.पी.एस सोसायट्याना मतदानाचा हक्क आहे.
डी.सी.सी बॅक निवडणूक चरशीची!
यंदा डी सी सी बॅकेची निवडणुक दि.१९ आँक्टोंबर रोजी होणार आहे. तेव्हा या निवडणुकीत खानापूर तालुक्यातील ५५ पी के पी.एस. सोसाट्याना मतदानाचा हक्क आहे.
यानिवडणुकीत निवडूण येण्यासाठी कमीत कमी २८ पी के पी एस सोसायटीचे मते मिळविणे गरजे आहे.
डी सी सी बॅकेच्या निवडणुकीत भाजप पक्षाचे आजी माजी आमदार आमणे सामने!
यंदाचा डी सी सी बॅकेच्या निवडणुकीत खानापूर तालुक्यातुन भाजप पक्षाचे विद्यामान आमदार विठ्ठलराव हलगेकर यांच्या विरोध्दात माजी आमदार व डी सी सी बॅकेचे संचालक अरविंद पाटील यांच्या मोठी लढत होणार आहे.
आता पासुनच आमदार विठ्ठलराव हलगेकर यानी खानापूर तालुक्यातील पी के पी एस सोसायट्यांच्या गोडावुण साठी १० कोटी रूपयाचा निधी देऊन संचालकाना खुष केले आहे.
गेल्या २० वर्षात खानापूर तालुक्यातील पी के पी एस सोसायटीना १० कोटीचा निधी मिळण्याची ही पहिलीच वेळ आहे. तेव्हा या निधीवरून आमदार विठ्ठलराव हलगेकर यांच्या पाठिशी जास्तीत जास्त संचालक उभे राहतील असा विश्वास वाटतो. जर असे झाले तर आमदार विठ्ठलराव हलगेकर याना विजय प्राप्त होण्यास सोयीचे होणार आहे.
यासाठी आमदार विठ्ठलराव हलगेकर यांचे प्रयत्न ही सुरू आहेत.
