संदेश क्रांती न्यूज :
खानापूर प्रतिनिधी
शेकडो वर्षांचा संस्थानिक राजेशाही इतिहासाचा वसा जपणारा जांबोटी (ता.खानापूर) येथील राजवाडा व देसाई गल्ली अनेक मूलभूत समस्यांच्या विळख्यात असुन ग्राम पंचायतीच्या हद्दीतील अनेक नवीन लोकवसाहती निर्माण झाली आहे. त्यांना सरकारी सर्व मूलभूत योजना गल्लोगल्ली रस्ते, पाण्याची समस्या सर्वच सामाजिक मूलभूत समस्यांचे निराकरण करण्यात आल्याआहेत.
पण मूळ गावचे वतनदार देसाई कुटुंबीयांच्या माती आजही निराशा कायमचीच आहे. यामुळे राजवाडा जांबोटी ग्रामस्थांचे जांबोटी ग्रामपंचायतीला ग्रामपंचायतचे उपाध्यक्ष सुनील देसाई यांच्यावतीने निवेदन देऊन ही समस्या लवकरात लवकर सोडवाव्यात. अशी मागणी केली आहे.
यावेळी निवेदन देताना जांबोटी विभाग जिल्हा पंचायतीचे माजी सदस्य जयराम देसाई यांच्यासह गावातील जेष्ठ आणि युवा पंचमंडळी तसेच गावातील ग्रामस्थ उपस्थित होते