#पत्रकार परिषदेत माहिती!
संदेश क्रांती न्यूज:
खानापूर प्रतिनिधी
खानापूर डी सी सी बॅकेच्या निवडणुकीत आमदार विठ्ठलराव हलगेकर याची उमेदवारी ठाम असल्याची माहिती गुरूवारी दि २८ रोजी शांतिनिकेतन पब्लिक स्कूल मध्ये आयोजित पत्रकार परिषदेत दिली.
यावेळी पत्रकार परिषदेत बोलताना यशवंत बीर्जे म्हणाले की,खानापूर डी सी सी बँक निवडणुक लढविण्यासाठी निवड समिती स्थापन करण्यात असुन या निवड समितीकडे आमदार विठ्ठलराव हलगेकर, एम एल सी चन्नराज हट्टीहोळी ,सामाजिक कार्यकर्ते व गर्लगुंजी पी के पी एस संचालक राजू सिध्दाणी,अशी तीन आली होती.
मात्र बुधवारी दि.२७ रोजी पालकमंत्री सतीश जारकिहोळी यानी चन्नराज हट्टीहोळी यानी निवडणुकीत माघारी घेतल्याचे स्पष्ट केल्याने लागलीच गुरूवारी आमदार विठ्ठलराव हलगेकर व राजू सिध्दाणी या दोन उमेदवारांच्या निवडीच्या चर्चेतुन आमदार विठ्ठलराव हलगेकर याची उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे.
यावेळी बोलताना सांगीतले की ,खानापूर डी सी सी बॅकेच्या निवडणुकीत खानापूर तालुक्यातील ५५ पी के पी एस सोसायटी मतदानाला पात्र आहेत.त्यापैकी २८ सोसायट्यांच्या पाठींब्याची गरज आहे. असे असताना आज आमच्याकडे ३५ सोसायटीचा पाठींबा असल्याचा विश्वास यशवंत बिर्जे यानी व्यक्त केला.त्यामुळे आमचा विजय निश्चित आहे. असे सांगीतले.
यावेळी पत्रकार परिषदेला उमेदवार आमदार विठ्ठलराव हलगेकर, राजू सिध्दाणी ,लक्ष्मण कसर्लेकर,शिव सेनेचे के पी पाटील ,लैला शुगरचे एम डी सदानंद पाटील,भरमाणी पाटील, महादेव घाडी,श्रीशैल तुरमुरी आदी मान्यवर उपस्थित होते.
निवडणुक चुरशीची होणार!
खानापूर डी सी सी बॅकेच्या निवडणुकीत
आमदार विठ्ठलराव हलगेकर व माजी आमदार अरविंद पाटील याच्यात थेट निवडणुकीचा सामना होणार आहे.
यावेळी बोलताना आमदार विठ्ठलराव हलगेकर म्हणाले की,गेल्या २० वर्षापासुन तालुक्यातील अनेक पीकेपीएस सोसायटीच्या तक्रारी होत्या.शेतकर्याना अजुनही शेअर्स मिळालेले नाहीत.तर काही ठिकाणी भ्रष्टाचारीचे प्रकार झाले आहेत. तर काही सोसायट्यांची पाच वर्षापासुन पतपुरवठा केलेला नाही .या तक्रारीमुळे जनतेच्या समस्या मार्गी लावण्यासाठी ही निवडणुक लढवित असल्याचे आमदार विठ्ठलराव हलगेकर यानी सा़ंगीतले.