संदेश क्रांती न्यूज :
खानापूर प्रतिनिधी
हारूरी ( ता.खानापूर) येथील महिलेचे गेल्या अनेक वर्षापासुन मानसिक संतुलन बिघडल्याने मानसिक अवस्थेतुन मंगळवारी दि .५ रोजी हलात्री नदीत उडी टाकून आत्महत्या केली.लक्ष्मी नारायण पाटील (वय ६६) असे महिलेचे नाव आहे.
याबाबत मिळालेली माहिती अशी की लक्ष्मी पाटील याची गेल्या काही वर्षापासुन मानसिक स्थिती चांगली नव्हती.त्या आजारी होत्या.त्यांच्यावर औषधउपचार चालु होते.
मात्र अनेक वर्षापासुन आजारामुळे निराश्यात होत्या.
सोमवारी रात्री पर्यत घरात कुटूंबासमवेत होत्या. मात्र मंगळवारी घरात न दिसल्याने घरच्यानी शोधाशोध केली. मात्र कुठेच पत्ता लागेन शेवटी हालात्री नदीच्या पुलाजवळ मृतदेह लाकडामध्ये अडकलेल्या स्थिती दृष्टीस पडला.
लागलीच अग्नीशामक दलाच्या जवानानी मृतदेह बाहेर काढला. त्यानंतर खानापूर सरकारी दवाखान्यात उत्तरीय तपासणीसाठी पाठवुन उत्तरीय तपासणी नंतर मृतदेह नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आला.
पोलिस पुढील तपास करत आहेत.