#आमदार विठ्ठलराव हलगेकर यानी दिल्या शुभेच्छा!
संदेश क्रांती न्यूज :
खानापूर प्रतिनिधी
तोपिनकट्टी ( ता. खानापूर ) येथील श्रीमहालक्ष्मी मल्टीपर्पज सोसायटीचे अँडमिन आँफिसर गुंडू पांखरे यांचा वाढदिवस सोसायटीच्या सभागृहात नुकताच पार पडला.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी आमदार व श्री महालक्ष्मी ग्रुपचे संस्थापक विठ्ठलराव हलगेकर होते.
प्रारंभी लक्ष्मण गुरव यानी प्रास्ताविक करून उपस्थितांचे स्वागत केले.
यावेळी आमदार विठ्ठलराव हलगेकर यांच्याहस्ते शाल ,पुष्पहार घालुन केक भरवुन वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या.
व्हाईस चेअरमन विठ्ठल करंबळकर, संचालक चांगाप्पा निलजकर,नागेश जोगोजी,नारायण हलगेकर,यल्लापा तिरवीर,पुंडलिक गुरव,बाबागौडा पाटील ,जनरल मॅनेजर तुकाराम हुंदरे आदीनी सोसायटीच्यावतीने पुष्पगुच्छ देऊन शुभेच्छा दिल्या.
त्याचबरोबर सोसायटीचे अँडव्हाझर राजाराम हलगेकर,शंकर शहापूरकर, तसेच विविध शाखाचे अधिकारी शंकर हुंदरे, अरूण काकतकर,जयराम गुरव,मोनेश्वर पाटील,जोतिबा सुतार, अनेक अधिकार्यानी शुभेच्या दिल्या. याजबरोबर लैला शुगर्सचे अधिकारी बाळासाहेब शेलार, श्री वागळे ,निवृत मुख्याध्यापक ए बी मुरगोड,दशरथ कुंभार सोसायटीचे कर्मचारी व महिलावर्ग तसेच मित्र परिवार मोठ्या संख्येने उपस्थित राहुन वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या.
यावेळी आमदार विठ्ठलराव हलगेकर बोलताना म्हणाले श्रीमहालक्ष्मी सोसायटीचे अँडमिन आँफिसर म्हणून सेवा बजवणारे गुंडू पांखरे हे शांत स्वभावचे व प्रामाणिक दिलेली सेवा करणारे व्यक्तीमत्व म्हणून त्यांच्याकडे पाहिले जाते. त्याच्या सेवेबद्दल किती बोलावे तितके कमीचे आहे. सर्वाशी सन्मानाने वागणारे व्यक्ती म्हणजे गुंडू पाखरे याना त्याच्या वाढदिवसाला लाख लाख शुभेच्छा. असे मनोगत व्यक्त केले.
यावेळी तोपिनकट्टी सह खानापुर शहरातील नागरीक वाढदिवसाच्या शुभेच्छा देण्यासाठी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
आभार हणमंत करंबळकर यानी मानले.