
#आमदारानी ही फोन घेतला नाही!
संदेश क्रांती न्यूज :
खानापूर प्रतिनिधी.
गेल्या चार दिवसापासुन खानापूर तालुक्याच्या पश्चिम भागातील निलावडे,मुघवडे,ओतोळीसह डोंगरगाव ,हेम्माडगा आदी गावच्या बसेस आल्याच नाहीत. त्यामुळे शालेय विद्यार्थ्याचे शैक्षणिक नुकसान झाले.
ऐवढेच नव्हेतर खानापूर बेळगाव बससेवा नियमित नसल्याने बेळगावला काॅलेज शिक्षणासाठी जाणार्या विद्यार्थ्याचे शैक्षणिक नुकसान झाले आहे.
ग्रा.पं.सदस्य संघटना अध्यक्ष विनायक मुतगेकर यानी डेपो मॅनेजरना धरले धारेवर!
मंगळवारी खानापूर तालुका ग्राम पंचायत सदस्य संघटना अध्यक्ष विनायक यांच्यानेतृत्वाखाली निलावडे,मुघवडे,ओतोळीसह डोंगरगाव,हेम्माडगा,भागातील विद्यार्थीसह नागरीकानी खानापर डेपो मॅनेजर श्री कांबळे याना घेराव घालुन धारेवर धरताच डेपो मँनेजर श्री कांबळे म्हणाले की, सध्या सहलीसाठी बसेस गेलेल्या आहेत. असे कारण सांगीतले.यापूढे ग्रामिण भागात वेळेत बससेवा करा.अन्यथा रास्ता रोको करण्याचा ईशारा दिला.
खानापूर बेळगाव मार्गावर ही बसेस कमी धावतात. बेळगावला विविध काॅलेजला जाणारे विद्यार्थी सकाळच्यावेळी दोन दोन तास उशीरा बेळगावला पोहचतात. असे सांगण्यात आले.
यावेळी विनायक मुतगेकर यानी आमदाराना फोन करून बससमस्या बाबत विचारण्याचा प्रयत्न केला मात्र फोन उचलला नाही.असे सांगीतले.
यावेळी खानापूर ग्राम पंचायत सदस्य संघटनेचे अध्यक्ष विनायक मुतगेकर सह शेकडो विद्यार्थी ,गावकरी उपस्थित होते.