
#जखमी शेतकर्याला बेळगावला दाखल!
संदेश क्रांंती न्यूज:
खानापूर ( सुहास पाटील )
खानापूर तालुक्यातील जंगलीभागात जंगली प्राण्याकडुन पिकाचे नुकसान त्याचबरोबर माणसावर हल्ले हे नित्याचेच झाले आहे.गेल्या वर्षभरापासुन हत्तीकडुन पिकांचे प्रचंड नुकसान होत असतानाच सोमवारी दि २ डिसेबर रोजी कणकुंबी वनिवभागातूल मान (ता.खानापूर ) येथील शेतकरी दोन अस्वलाच्या हल्ल्यात गंभीर जखमी झाल्याची घटना घडली. शेतकर्याचे नाव सखाराम महादेव गावकर (वय ६२) असुन त्याची पत्नी सुदैवाने अस्वलाच्या हल्ल्यातुन सुटका झाली आहे.
याबाबत घटनास्थळावरून मिळालेली माहिती अशी की मान (ता.खानापूर) शेतकरी सखाराम व त्याची पत्नी गावापासुन जवळच्याच शेतात काम करत असताना अचानक दोन अस्वलानी शेतकर्यावर हल्ला केला. यात सखाराम हे गंभीर जखमी झाले.मात्र पत्नीने प्रसंगावधान राखुन हल्ल्यातुन सुटका करून घेतली.त्यामुळे त्या बचावल्या लागलीच सखाराम याना प्रचारासाठी बेळगांव येथील दवाखाण्यात उपचारासाठी दाखल करण्यात आहे.
कणकुंबी वनाधिकार्यानी पंचनामा केला आहे.हल्ली जंगली प्राण्याचे हल्ले तसेच पिकाचे नुकसान होत आहे.याकडे सरकारने लक्ष देणे गरजेचे आहे.