
#गुंजीपरिसरात भात गंज्या विस्कटून नुकसान!
संदेश क्रांती न्यूज :
खानापूर ( सुहास पाटील )
खानापूर तालुक्यात वर्षभरच हत्तीकडुन पिकाचे नुकसान होत आहे. गेल्या काही दिवसापूर्वी मडवाळ,घोटगाळी,शिवठाण,शिंदोळी सह कापोलीभागात ९ हत्तीच्या कळपाने भातपिकाचे नुकसान केले आहे. ह्या घटना ताज्या असतानाच आता या ९ हत्तीच्या कळपाने गुंजी परिसरातील भटवाडा,भालके,वाटरा, कामतगा आदी भागात शिवारातील उभ्या भात पिकाबरोबर भातगंज्या विस्कटून मोठ्या प्रमाणात नुकसान केले आहे.
गेल्या दोन दिवसात कामतगा शिवारातील ज्ञानेश्वर घाडी, मारूती जोशिलकर,वामन नाईक ,पाडु नाईक,अशोक गवाळकर ,शिवाजी गवाळकर,तसेच भटवाडा येथील शंकर चौगुले,धनाजी चौगुले ,रेणूका शहापूरकर त्याचबरोबर भालके येथील शांताराम आळवणे,यांच्या भात पिकांचे नुकसाने झाले .
मंगळवारी ही गुंजी परिसरात हत्तीनी हजेरी लावली होती.यामध्ये गंगराम पाटील ,रामु काळीचे यांच्या भात पिकाचे मोठ्या प्रमाणात नुकसान केले आहे.
गुंजी परिसरात जवळपास १० हत्तीचा धुमाकुळ सुरू आहे.यातील चार पाच हत्ती भटवाडा परिसरात तर एक हत्ती तळपांडे जंगलात विश्रांती घेत असुन चार हत्तीनी कामतगा जोमतळा भागात वास्तव्य केले आहे.
या घटना ताज्या असतानाच रविवारी १ डिंसेबर रोजी हत्तीकडुन कोडचवाड परिसरात सकाळीच भात पिकाचे नुकसान झाले आहे.सध्या भात कापून घातलेल्या भातगंज्याचे ही हत्तीकडुन नुकसान झाले आहे.
कोडचवाड परिसरात आलेला हत्ती कुठे ठाणे मांडुन राहणार याची भिती कोडचवाड परिसरातील शेतकर्यातुन निर्माण झाली आहे.
तालुक्यातील हत्तीच्या दहशती पुढेे तालुका प्रतिनिधीनी व वनखात्याच्या अधिकार्यानी हात टेकले आहेत. त्यामुळे तालुक्यातील शेेतकर्यातुन चिंत्तेचे सावट पसरले आहे.