
डाॅ.ऐश्वर्या पाटील हिचा सत्कार!
संदेश क्रांती न्यूज :
खानापूर ( सुहास पाटील )
सिंगीनकोप ( ता.खानापूर ) येथे श्री कलमेश्वर प्रसन्न शर्यत कमिटीच्यावतीने नुकताच भव्य जंगी शर्यतीचे उदघाटन करण्यात आले.
यावेळी कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी उधोगपती बाळगौडा पाटील उपस्थित होते.
तर शर्यतीचे उदघाटन आमदार विठ्ठल हलगेकर व माजी आमदार अरविंद पाटील यांच्याहस्ते बैलगाडी हाकुन करण्यात आले.
तर दीपप्रज्वलन व विविध देवदेवतांच्या फोटोचे पुजन उपस्थित मान्यवरांच्याहस्ते करण्यात आले .
यावेळी कार्यक्रमाला माजी आमदार दिगंबर पाटील ,जांबोटी सोसायटीचे संस्थापक विलासराव बेळगावकर, भाजपा तालुका माजी अध्यक्ष संजय कुबल, भाजप नेते सदानंद होसुरकर,ग्राम पंचायत अध्यक्षा लक्ष्मी नाईक, सदस्य चांगाप्पा बाचोळकर,माजी तालुका पंचायत सदस्य एन डी पाटील ,इदलहोंड पीडीओ बळीराम देसाई,गावातील नागरीक उपस्थित होते.
प्रास्ताविक मल्लापा मोरे यानी केले.
यावेळी उपस्थित मान्यवराचा फेटा बांधन सत्कार करण्यात आला.
तर कार्यक्रमाचे औचित्य साधुन सिंगीनकोप गावची कन्या डाॅ.ऐश्वर्या गोविंद पाटील हिचा फेटा,शाल, पुष्पहार घालुन आजी ,माजी आमदाराच्याहस्ते सत्कार करण्यात आला.
यावेळी उपस्थित मान्यवरांची भाषणे झाली.
ही शर्यत मोठा गट व लहान गट (बिनदाती ) अशा दोन गटात आयोजन करण्यात आले.
विजयी बैलजोडी मालकाना बक्षिसे अनुक्रमे ४१ हजार १ रू.,३१हजार १रू., २५ हजार १रू.,१८ हजार १ रू.,१५ हजार २ रू.,१२हजार १रू.,१०हजार १ रू. अशी १६ बक्षिसे देण्यात येणार आहेत.
# लहान गट बीनदाती बैलजोडी मालकाना बक्षिसे अनुक्रमे २१हजार १ रू.,१८ हजार १रू.,१५ हजार १ रू.,१३ हजार १ रू.,११ हजार १ रू.९ हजार १ रू.,७ हजार १रू.,६ हजार १रू.,५ हजार १रू अशी एकूण १७ बक्षिसे देण्यात येणार आहेत.
शर्यत पार पाडण्यासाठी श्री कलमेश्वर प्रसन्न शर्यत कमिटी व ग्रामस्थानी परिश्रम घेतले.