
#जांबोटीत शिवस्मारक उभारण्याचा संकल्प यशस्वी!
संदेश क्रांती न्यूज :
खानापूर प्रतिनिधी
जांबोटी (ता.खानापूर) नाट्यकलाकरांनी शनिवारी रात्री जांबोटी रोडवरील शुभम गार्डन कार्यालयात “एकच प्याल ” संगीत नाटक सादर करून रसीकांची दाद मिळविली. जांबोटीत शिवस्मारक उभारण्याच्या हेतून शिवसंकल्प संघटनेेने हाती घेतलेले कार्यकौतुकास्पद आ़हे.
यावेळी एकच प्याला नाट्यप्रयोगाचे उदघाटन आमदार विठ्ठलराव हलगेकर याच्याहस्ते करण्यात आले.
यावेळी कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी जांबोटीचे श्रीमंतसरकार करणसिंह सरदेसाई होते. तर व्यासपिठावर माजी आम.अरविंद पाटील,भाजपचे जिल्हापाध्यक्ष प्रमोद कोचेरी, शिवसेना राज्य उपाध्यक्ष के.पी.पाटील,पीएलडी बॅकेचे चेअरमन मुरलीधर पाटील, अर्बन बॅकेचे संचालक मारूती पाटील, शुभम गार्डनचे मालक राजू पासलकर,खानापूर डाॅक्टर असोसिएशनचे अध्यक्ष डाॅ.डी ए.नाडगौडा,बाबा देसाई,माजी केडीपी मेंबर प्रकाश पाटील,दत्ता देसाई आदी उपस्थित होते.
उपस्थितांचे स्वागत जांबोटी शिवसंकल्प संघटनेचे प्रमुख व भाजप नेत्या सौ धनश्री सरदेसाई यानी केले.
यावेळी उपस्थित मान्यवरांच्या हस्ते दीपप्रज्वलन करण्यात आले.
यावेळी उपस्थित मान्यवरानी विचार व्यक्त केले. त्यानंतर “एकच प्याला ” नाट्यप्रयोगाचा शुभारंभ करण्यात आला.
यावेळी कार्यक्रमाचे सुत्रसंचालन सुरेश कळेकर यानी केले.तर आभार शिक्षक तुकाराम सडेकर यांनी मानले.
जांबोटीच्या नाट्यकलाकारानी संगीत एकच प्याला नाट्य प्रयोग सादर करून खानापूर तालुक्यातील नाट्यरसिकांना तब्बल पाच तास खुर्चीत खिळवुन ठेवले.तसेच रसिकाकडुन दाद मिळविली.