
यंदाचा निव्वळ नफा ६४,६९,७०२ रू.!
भाग भांडवल १,२४,४६,१९५ रू.
संदेश क्रा़ंती न्यज:
खानापूर ( सुहास पाटील )
तोपिनकट्टी ( ता. खानापूर ) येथील श्रीमहालक्ष्मी ग्रुप संचालित श्रीमहालक्ष्मी मल्टीपर्पज को.आँप.सोसायटीचा ३० वी वार्षिक सभा नुकताच शांतिनिकेतन पब्लिक स्कूलच्या सभागृहात पार पडली.
सभेच्या अध्यक्षस्थानी सोसायटीचे संस्थापक चेअरमन व आमदार विठ्ठलराव हलगेकर होते.व्यासपिठावर व्हा.चेअरमन विठ्ठल करंबळकर,संचालक चांगाप्पा निलजकर, महादेव गुरव,नागेश जोगोजी,नारायण हलगेकर,यल्लाप्पा तिरवीर,परशराम तिरवीर,पुंडलिक गुरव,बाळगौडा पाटील, देवेंद्र हुंडेड,संचालिका मिनाक्षी बांदिवडेकर,राजश्री हलगेकर,पार्वती शाहापूरकर,रेणुका कोलकार आदी उपस्थित होते.
यावेळी प्रास्ताविक व स्वागत जनरल सेक्रेटरी तुकाराम हुंदरे यांनी केले.
तर सभेची सुरूवात संस्थापक चेअरमन व आमदार विठ्ठलराव हलगेकर उपस्थित मान्यवरांच्या हस्ते दीपप्रज्वलन व लक्ष्मी फोटो पुजन करण्यात आले.
यावेळी मॅनेजर शंकर हुदरे यानी आहवाल वाचन केले. अहवाल वाचनात बोलताना सांगीतले की सोसायटीकडे एकूण ३५२ कोटी १५ लाख ९३ हजार १८५ रूपये ठेवी असुन सोसायटीने १७६ कोटी,२० लाख ,१२ हजार ४४ रूपये कोटीचे कर्ज वाटप करण्यात आले आहे.तर १३५ कोटी ८लाख १२ हजार ५८ रूपये इतकी सोसायटीने गुंतवणूक केली आहे.
यावेळी कार्यक्रमाचे औचित्य साधुन महिला मेजर आशा परशराम करंबळकर यांचा सत्कार तसेच प्रगतशील शेतकरी मल्लापा पाटील, भाग भाडवलदार निवृत्त शिक्षक,गुणी विद्यार्थ्याचा सत्कार आमदार विठ्ठलराव हलगेकर व संचासक मंडळाच्या हस्ते करण्यात आला.
वार्षिक सभेला सोसायटीचे विविध शाखाचे मॅनेजर तसेच सभासद मोठ्या संख्येने उपस्थित होते.
कार्यक्रमाचे सुत्रसंचालन एल.व्ही .गुरव यानी केले. आभार अरूण काकतकर यानी मानले.