
बुधवारी दि.१४ रोजी कार्यक्रम!
– श्री दत्त पद्मनाभ पीठ – गोवा द्वारे आयोजन !
संदेश क्रांती न्यूज .
खानापूर प्रतिनिधी
भारतीय संस्कृतीत षोडश संस्कार मुख्य सांगितले आहेत. आणि त्यातील एक महत्त्वाचा संस्कार म्हणजे “उपनयन” अर्थातच ब्रह्मचर्याश्रमात प्रवेश होय. यामध्ये विद्यार्थ्याला गुरुकुल शिक्षण, गायत्री मंत्र दीक्षा आणि धर्म ज्ञान, संयम यांचे ज्ञान दिले जाते. उपनयन म्हणजे आत्मशुद्धी, विचारशुद्धी आणि जीवनमार्ग शुद्ध करण्याचा एक दिव्य संस्कार.
गेली कित्येक वर्षे श्री दत्त पद्मनाभ पीठ,पीठाधीश्वर अध्यात्म शिरोमणि, पद्मश्री सद्गुरु ब्रह्मेशानंदाचार्य स्वामीजींच्या दिव्य आशीर्वादाने श्री दत्त पद्मनाभ पीठ तथा स्वामी ब्रह्मानंद वैदिक गुरुकुल ॲण्ड रिसर्च इन्स्टिट्यूट गोवा यांच्या माध्यमातून गोवा, महाराष्ट्र व कर्नाटक अशा विविध प्रांतांमध्ये हा उपनयन संस्कार समारंभ आयोजित केला जातो .
या वर्षी हा उपनयन संस्कार समारंभ बुधवारी दि. १४ मे रोजी श्री चांगळेश्वरी मंदीर, येळ्ळूर – बेळगांव येथे आयोजित करण्यात आला आहे. येळ्ळूर क्षेत्रातील समस्त हिंदू धर्माभिमानी कुटुंबीयांना आवाहन आहे . की आपल्या पुत्रांचा या पवित्र संस्कारासाठी मोठ्या संख्येने सहभाग नोंदवून सनातन परंपरेचा वारसा भावी पिढीचे उज्वल भवितव्य घडवूया. असे आवाहन आयोजकांद्वारे करण्यात आले आहे.