
संदेश क्रांती न्यूज :
खानापूर ( सुहास पाटील )
तोपिनकट्टी ( ता.खानापूर) येथील श्री महालक्ष्मी एज्यूकेशन सोसायटी संचालित शांतिनिकेतन पब्लिक स्कूल सीबीएसई दहावीचा निकाल ९१.६ टक्के लागला आहे.
स्कूलमधुन कु. मिलन यडाल हिने ९२ टक्के गुण घेऊन प्रथम क्रमांक पटकाविला. तनिष्का देसाई हिने ९१.२ टक्के गुण घेऊन व्दितीय क्रमांक तर कौस्तुभ पाटील हिने ८९ टक्के गुण घेऊन तृतीय क्रमांक पटकाविला.
शांतिनिकेतन पब्लिक स्कूल मधुन १९ विद्यार्थी विशेष श्रेणीत तर २८ विद्यार्थी प्रथम श्रेणीत आले आहेत.
यशस्वि विद्यार्थ्याचे श्रीमहालक्ष्मी ग्रूप एज्यूकेशन सोसायटीचे चेअरमन व आमदार विठ्ठलराव हलगेकर व शांतिनिकेतन पब्लिक स्कूल( सीबीएससी )चेअरमन प्रा.भरत तोपिनकट्टी ,
सचीव प्रा.आर.एस .पाटील आदीनी अभिनंदन केले. ,तसेच प्राचार्या व इतर शिक्षकाचे मार्गदर्शन मिळाले.
यशस्वि विद्यार्थ्याचे खानापूर तालुक्यातुन कौतुक होत आहे.