
#तोपिनकट्टी गर्लगुंजी रोडवरील श्री कलमेश्वर मंदिराच्या आवारात सोहळा !
संदेश क्रांती न्यूज :
खानापूर (सुहास पाटील )
तोपिनकट्टी (ता. खानापूर ) गावचे सुपूत्र श्री मारूती बुध्दाप्पा मुरगोड यांचा रविवारी दि.१८ मे रोजी अमृतमहोत्सवी वाढदिवस कार्यक्रमाचे आयोजन तोपिनकट्टी ग्रामदेवता श्री कलमेश्वर मंदिराच्या आवारात करण्यात आले.
प्रारंभी एल व्ही गुरव यानी प्रास्ताविक केले. तर निवृत्त मुख्याध्यापक ए.बी.मुरगोड यानी उपस्थितांचे स्वागत केले.
मारूती बुध्दाप्पा मुरगोड यांच्या अमृतमोहत्सवी वाढदिवसा निमित्त केक कापून वाढदिवस साजरा करण्यात आला.
यावेळी बोलताना एल व्ही गुरव म्हणाले की,मारूती मुरगोड हे तोपिनकट्टी गावचे कुंभार समाजातील जेष्ठ व्यक्ती आहे. शांतस्वभावाचे कुणाच्या अध्यात ना मध्यात आपले काम व आपण असा स्वभाव त्यामुळे ते सर्वांचे आवडते आहेत.
आज त्यानी ७५ वर्षे ओलांडली त्यानिमित्त त्याच्या अमृतमोहत्सव सोहळ्याचे आयोजन करण्यात आले.
यावेळी तोपिनकट्टी ग्राम पंचायतीचे सदस्य मारूती गुरव, श्री महालक्ष्मी ग्रुपचे महादेव बांदेवडेकर,अरूण काकतकर, तालुका शिक्षक सोसायटीचे संचालक के एच कौंदलकर,जोतिबा घाडी,हणमंत करंबळकर,एस एल भक्तूरी, गोविंद पाटील, श्री कुकडोळकर निवृत्त मुख्याध्यापक रघुनाथ कुंभार आदी शिक्षक वर्ग तसेच सामाजिक कार्यकर्ते विनायक मुतगेकर, तोपिनकट्टी गावचे ग्राम पंचायत सदस्य व नागरीक ,आप्तेष्ट ,मित्रमंडळी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
आभार निवृत्त मुख्याध्यापक ए बी मुरगोड यानी मानले.
तरी अमृतमहोत्सवी वाढदिवसाला सर्वानी मोठ्या संख्येने उपस्थित राहण्याचे आवाहन निवृत्त मुख्याध्यापक ए बी मुरगोड यानी केले आहे.