
#बेरोजगारीमुळे उचलले टोकाचे पाऊल!
संदेश क्रांती न्यूज :
खानापूर प्रतिनिधी
तिवोली ( ता.खानापूर )येथील युवक प्रकाश कारू मिनोज ( वय ३१ ) याने बुधवारी दि ११ रोजी आपल्या राहत्या घरी कोणी नसल्याचे पाहुन आत्महत्या केल्याची घटना समोर आली.
याबाबत मिळालेली माहिती अशी की प्रकाश मिनोज हा गोवा येथे गेल्या वर्षाभरापासुन नोकरी होता.तो नोकरीसोडुन गावाकडे आला होता.वर्षभर बरोजगार असल्याने त्याने आत्महत्ये सारखा टोकाचा विचार केला.बुधवारी घरी कोण नव्हते.आई शेताला गेली होती.त्यामुळे सकाळी १० वाजण्याच्या सुमारास आत्महत्या केली़ .
संध्याकाळी ६ वाजण्याच्या सुमारास आई शेतातुन घरी आली.त्यावेळी मुलाने आत्महत्या केल्याचे दृष्टीस पडताच .आईने एकच अक्रोश केला.
घटनेची माहिती मिळताच खानापूर पोलिसानी घटनास्थळी धाव घेऊण पंचनामा केला.व मृत्यूदेह उत्तरीय तपासणीसाठी खानापूर सरकारी दवाखान्यात पाठविण्यात आला.
उद्या गुरूवारी उत्तरीय तपासणी नंतर मृत्यूदेह नातेवाईकांच्या ताब्यात देणार येणार आहे.