
संदेश क्रांती न्यूज :
खानापूर ( सुहास पाटील)
कर्नाटक राज्यात काॅग्रेसचे सरकार आल्याबरोबर गोरगरीब जनतेसाठी काॅग्रेस सरकारने पंचहमी योजना सर्वसामान्य जनतेपर्यत पोहचविल्या त्याचा लाभ सर्वाना झाला.याचा मला सार्थ अभिमान आहे.असे विचार खानापूर तालुका ग्रामीण ब्लाँक अध्यक्ष अँड.ईश्वर घाडी यानी नायकोल (ता.खानापूर ) येथील विठ्ठल रूक्मिणी मंदिराच्या कळस भरणी कार्यक्रमात बोलत होते.
यावेळी ते म्हणाले की,
खानापूर तालुक्यात सांप्रदायिक मंडळींची संख्या पाहिली तर नजीकच्या काळामध्ये खानापूर तालुका प्रति पंढरपूर व्हायला वेळ लागणार नाही माणसानी सकारात्मक ऊर्जा मनामध्ये आणली तरच गावच्या एकीतून अशी धार्मिक मंदिरे उभा होण्यास वेळ लागणार नाही.असे विचार खानापूर ग्रामीण ब्लाॅक अध्यक्षअँड.ईश्वर घाडी यानी व्यक्त केले.
पुढे म्हणाले की काँग्रेस पक्ष सुद्धा सांप्रदायिक आणि बारा बलुतेदार आणि अठरापगड जाती जमातीच्या लोकांना घेऊन विकास साधतोय आणि म्हणूनच आज खानापूर तालुक्याच्या कार्यसम्राज्ञ माजी आमदार डॉ.अंजली निंबाळकर तसेच एआयसीसीच्या कार्यदर्शी यांनी आपल्या आमदारकीच्या काळामध्ये सरकारी हॉस्पिटल ,बस स्टॅन्ड हायटेक, सरकारी ऑफिसिअस, ६०० शाळांच्या खोल्या ,रस्ते व सरकारी कार्यालय इत्यादी अनेक काम करून एक इतिहास निर्माण केला त्याच बरोबर काँग्रेस पक्षाने २०२३ च्या निवडणुकीमध्ये दिलेल्या आश्वासनाची पूर्तता सुद्धा आज तालुक्यातील सर्व नागरिकांना मिळत आहे.
आज माजी आमदार डाॅ अंजली निंबाळकर यानी माझ्यावर विश्वास ठेवून खानापूर तालुका ग्रामीण ब्लाॅक अध्यक्षाची धुरा माझ्या हातात दिली. त्यामुळे काॅग्रेस पक्ष वाढवुन जनतेची समस्या सोडविण. असे सांगीतले.
ते म्हणाले की नायकॉल गावाच्या पाठीशी काँग्रेस पक्ष नेहमीच पाठीशी उभा राहील आणि गावचा विकास साधण्यासाठी मागे पडणार नाही अशी ग्वाही त्यांनी नायकोल (ता.खानापूर) येथील विठ्ठल रूक्मिणी मंदिराच्या कळस पायाभरणी कार्यक्रमात बोलताना दिली.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी कृष्णा मनोळकर होते.तर प्रमुख पाहुणे म्हणून तालुका ग्राम पंचायत सदस्य संघटनेचे अध्यक्ष विनायक मुतगेकर ,ईश्वर बोबाटे,यशवंत बीरजे,राजू पाटील,दीपा पाटीलतसेच गावातील प्रतिष्ठित नागरिक कृष्णा अंधारे ,रावजी पाटील, अर्जुन अंधारे, शुभांगी अंधारे ,रेणुका पाटील आदी उपस्थित होते.
तर प्रमुख वक्ते म्हणून प्रा.आय एम गुरव हजर होते.
उपस्थित पाहुण्याच्याहस्ते मंदिराच्या कळसाची पायाभरणी करण्यात आली.
यावेळी यशवंत बिर्जे, विनायक मुतगेकर ,सुर्यकांत कुलकर्णी इत्यादींची भाषणे झाली.