
#जिल्ह्याचे अधिकारी कित्तूर उत्सवाकडे!
संदेश क्रांती न्यूज :
खानापूर प्रतिनिधी
खानापूर नगरपंचायतीच्या १३ कंत्राटी कामगार गेल्या ३० वर्षापासुन सेवा बजावत आहेत.मात्र सेवेत कायम केले नाही.
आम्ही नगरपचायतीने नेमलेल्या विभागात काम करत असुन आता थेट नगरपंचायतीच्या भरती अंतर्गत कायम करण्यासाठी अर्ज केला असुन खानापूर नगरपंचायत वगळता बेळगाव जिल्ह्यातील सर्व स्थानिक स्वराज संस्थामध्ये नोकरभरती प्रक्रिया संपली आहे. परंतू आमच्ययाकडे दुर्लक्ष करण्यात आल्याने कायमस्वरूपाची कार्यवाही झाली नाही.
त्यामुळे नगरपंचायतीच्या कंत्राटी कामगारानी मंगळवारी दि २२ रोजी आंदोलन सुरू केले.मात्र बुधवारी दि २३ रोजी बेळगाव जिल्हा पौर सेवा नोकर संघाचे रमेश बल्लारी यानी भेट देऊन सध्या कित्तुर उत्सवाला जिल्ह्यास्तरीय अधिकारी कामात व्यस्त असल्याने संप मागे घेण्याचे सांगण्यात आले. व संपाची तारीख निश्चित करून पुन्हा आंदोलन छेडण्यात येणार असल्याचे आंदोलन कर्ते शानुर गुलडार यानी सांगीतले.
यावेळी कंत्राटी कामगारा समवेत नगरसेवक लक्ष्मण मादार,प्रकाश बैलुरकर,मजहर खानापूरी,मेघा कुंदरगी,रफिक वारेमणीसह चिफआँफिसर संतोष कुरबेट, इंजिनिअर तिरूपती व इतर उपस्थित होते.