
# ४ विद्यार्थ्याची जिल्हास्तरीयस्पर्धेसाठी निवड!
संदेश क्रांती न्यूज :
खानापूर ( सुहास पाटील)
लोंढा (ता.खानापूर ) येथे तालुका स्तरीय प्रतिभा कारंजी स्पर्धा शुक्रवारी दि.२६ रोजी पार पडल्या.
या स्पर्धेत मन्सापूर येथील सेंट जोसेफ स्कूल च्या विद्यार्थ्यानी भाग घेऊण घवघवीत यश मिळाले आहे.
या शाळेच्या ४ विद्यार्थ्याची जिल्हास्तरीय स्पर्धेसाठी निवड झाली असुन ते तालुक्याचे प्रतिनिधित्व करणार आहेत. यास्पर्धेतील विजयी स्पर्धक कुमार स्वराज जयराज चापगावकर, निधी निरंजन देसाई, आराध्या राजेश जांबोटि, विदिशा विनोद सुखया, यांनी प्रथम क्रमांक पटकावला तर सुयश संदीप मुंनोळी, दीक्षा पाटील, श्रेया पंडाप्पा तुरमुरी, श्लोक सचिन कुंभार, यांनी द्वितीय क्रमांक पटकावला, ह्या सर्व विद्यार्थ्यांना शाळेच्या मुख्याध्यापिका सिस्टर दीपा, सर्व शिक्षकवृंदाचे मार्गदर्शन लाभत आहे. त्याचबरोबर पी. टी. ए बॉडीचे अध्यक्ष उदय देसाई तसेच सर्व पी. टी.ए सदस्यांचे सहकार्य लाभत आहे. विजयी स्पर्धकाचे तालुक्यातून तसेच पालकवर्गातून तसेच सीआरपी रूपा पवार यांच्याकडुन अभिनंदन होत आहे.