
संदेश क्रांती न्यूज :
नुकताच चंदर्गी येथे संपन्न झालेल्या हॉकी विभागीय स्पर्धेत सुरूवायतीलाच चिकोडी जिल्हाचं नेतृत्व करणाऱ्या संघाला ४\० ने नमवत, दुसऱ्या फेरीत तुल्यबळ बागलकोट संघाला ५\० ने हरविले त्यानंतर चुरशीच्या अंतिम सामन्यात धारवाडच्या डी वाए एस बलाढ्य संघांचा १\० ने पराभव करीत प्रेक्षकाच्या डोळ्यांचे पारणे फेडले.
या विजयी संघाचे नेतृत्व कॅप्टन मयुरी कंग्राळकर हीने केले, या संघाचे गोलकीपर नेत्रा गुरव ही असून कुमारी साक्षी पाटील, राधिका पाटील, साक्षी चौगुले, सविता चिगदीनकोप, आयेशा शेख, प्रीती नांदुडकर, ममता कुंभार, सानिका पाटील, श्रेया पाटील, अनुराधा मयेकर, श्रेया गोंधळी, वैष्णवी ईटनाळ, सेजल भावी, तनुश्री गावडे, निशा दोडमनी, भूमी लटकन, वैष्णवी नाईक या खळांडुचा सहभाग आहे.
या खेळाडूंना मराठा मंडळ संस्थेच्या अध्यक्षा डॉक्टर राजश्रीताई नागराजू व संचालक शिवाजीराव पाटील तसेच ज्येष्ठ संचालक परशराम गुरव शाळेचे मुख्याध्यापक राहुल एन जाधव यांचे सदैव प्रोत्साहन मिळत आहे.
तर शाळेच्या क्रीडा शिक्षिका श्रीमती अश्विनी टी पाटील यांचे मार्गदर्शन लाभत असून, ताराराणी पदवीपूर्व महाविद्यालयाचे प्रा. अरविंद पाटील यांच्यासह बेळगाव हॉकी फेडरेशन सेक्रेटरी सुधाकर चाळके, कोच उत्तम शिंदे, संतोष दरेकर, गणपत गावडे, सदस्य नामदेव सावंत, मनोहर पाटील, क्रीडा शिक्षक श्री वाय एफ निलजकर,सी के
गोमानाचे, यु एम धबाले श्रीमती एम एन पाटील यांचे विशेष मार्गदर्शन लाभले आहे. या घवघवीत यशासाठी सदर खेळाडूंचे सर्वत्र अभिनंदन होत आहे.
तसेच कोडगू जिल्ह्य़ातील मडीकेरी येथे संपन्न होणाऱ्या राज्य स्तरीय स्पर्धेसाठी या खेळाडूंची निवड झाली आहे.