
#एका बैलजोडीने चाके न बांधता गाडी ओढण्याची दोन गटात शर्यत!
#मोठा गट व बीन दाती लहान गट!
संदेश क्रांती न्यूज :
खानापूर ( सुहास पाटील )
सिंगीनकोप ( ता.खानापूर ) येथे श्री कलमेश्वर प्रसन्न शर्यत कमिटीच्यावतीने गुरूवारी दि.२८ रोजी सकाळी १० वाजता भव्य जंगी शर्यतीचे आयोजन करण्यात आले आहे.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी उधोगपती बाळगौडा पाटील राहणार आहेत.
तर मोठा गट शर्यतीचे उदघाटन खासदार विश्वेश्वर हेगडे कागेरी व लहान गट शर्यतीचे उदघाटन आमदार विठ्ठल हलगेकर व माजी आमदार अरविंद पाटील यांच्याहस्ते होणार असुन दीपप्रज्वलन व विविध देवदेवतांच्या फोटोचे पुजन उपस्थित मान्यवरांच्याहस्ते होणार आहे.
# मोठा गट विजयी बैलजोडी मालकाना बक्षिसे अनुक्रमे ४१ हजार १ रू.,३१हजार १रू., २५ हजार १रू.,१८ हजार १ रू.,१५ हजार २ रू.,१२हजार १रू.,१०हजार १ रू. अशी १६ बक्षिसे देण्यात येणार आहेत. वेळ १मिनिट,प्रवेश फी ४१००रू.आहे.
# लहान गट बीनदाती बैलजोडी मालकाना बक्षिसे अनुक्रमे २१हजार १ रू.,१८ हजार १रू.,१५ हजार १ रू.,१३ हजार १ रू.,११ हजार १ रू.९ हजार १ रू.,७ हजार १रू.,६ हजार १रू.,५ हजार १रू अशी एकूण १७ बक्षिसे देण्यात येणार आहेत.
वेळ १ मिनिट व प्रवेश फी २१०० रू.आहे.
तरी हौशी बैलजोडी मालकानी यांचा लाभ घ्यावा.असे आवाहन श्री कलमेश्वर प्रसन्न शर्यत कमिटी व ग्रामस्थ यांच्यावतीने करण्यात आले आहे.