
#तालुका काॅग्रेस ब्लाॅक अध्यक्ष अँड.ईश्वर घाडी यानी केली शिफारस!
संदेश क्रांती न्यूज:
खानापूर प्रतिनिधी.
खानापूर तालुक्यातील अति मागासलेल्या शिरोली गावच्या सरकारी हायस्कूलमध्ये गेल्या जुन महिण्यापासुन कायम स्वरूपी विज्ञान शिक्षक नाही. त्यामुळे विद्यार्थ्याचे शैक्षणिक नुकसान होत आहे. तेव्हा कायम स्वरूपी विज्ञान शिक्षकाच्या मागणीसाठी शिरोली हायस्कूलला विद्यार्थ्यानी टाळे टोकून खानापूर बीईओ कार्यालयासमोर जोरदार निर्देशन केली.
ही माहिती खानापूर तालुका ब्लाॅक काॅग्रेस अध्यक्ष अँड ईश्वर घाडी यानी बीईओ कार्यालयाला भेट देऊन विद्यार्थ्याच्या समस्या ऐकूण घेतल्या.
लागलीच बीईओ राजेश्री कुडची यांच्या चर्चा करून गेल्या जुन महिण्यापासुन विज्ञान शिक्षक कायमस्वरूपी नसल्याने विद्यार्थ्याचे शैक्षणिक नुकसान झाले आहे. येत्या दहावीच्या परिक्षेत विज्ञान विषयात नापास झालेल्या विद्यार्थ्याने जीवाचे बरेवाईट करून घेतले याला कोण जबाबदार असा प्रश्न फोन व्दारे डीडीपीआय अधिकार्याना करताच बीईओ राजश्री कुडची यानी शिरोली हायस्कूलसाठी ३१ मार्च पर्यत विज्ञान शिक्षकाची कायम स्वरूपी नेमणूक करण्याचे आश्वासन देताच विद्यार्थ्यानी निर्देशन मागे घेतली. यापूढे विज्ञान विषयाचे नुकसान होणार नाही असे सांगीतले.
यावेळी खानापूर तालुका ब्लाॅक क्राॅग्रेस अध्यक्ष अँड.ईश्वर घाडी यानी प्रत्यक्ष शिरोली सरकारी हायस्कूल येत्या काही दिवसात भेट देऊण परिस्थितीची पाहणी करणार असल्याचे आश्वासन दिले.
यावेळी खानापूर तालुका ग्राम पंचायत सदस्य संघटनेचे अध्यक्ष विनायक मुतगेकर, शिरोली भागाचे कार्यकर्ते विजय मादार ,शाळा सुधारणा समितीचे सदस्य, शिरोली गावचे नागरीक ,विद्यार्थ्यी मोठ्या संख्येने उपस्थित होते.