
#श्रीलंका इंडो येथील अंतरराष्ट्रीय स्पर्धेत निवड!
संदेश क्रांती न्यूज:
खानापूर ( सुहास पाटील)
शिवोली ( ता. खानापूर ) गावचा सुपूत्र व कोगनोळी येथील इंटरनॅशनल पब्लिक स्कूल युवा सायन्स अँकडमीचा खेळांडू कुमार मारूती विलास पाटील याने नुकताच शितो रियो कराटे असोसीएशन नेपाळ येथे दि ९ मे व १० मे रोजी झालेल्या अंतरराष्ट्रीय स्पर्धेत भाग घेऊन सुवर्णपदक पटकाविले. त्याची निवड श्रीलंका इंडो येथे होणार्या अंतरराष्ट्रीय स्पर्धेसाठी निवड झाली.
कुमार मारूती पाटील हा मुळचा शिवोली ( खानापूर ) गावचा असुन त्याचे प्राथमिक शिक्षण चापगांव तर माध्यमिक शिक्षण खानापूर येथील सिध्दीविनायक इंग्लिश मिडीय स्कूल मध्ये झाले.
तर काॅलेजचे शिक्षण कोगनोळी येथील इंटरनॅशनल पब्लिक स्कूल युवा सायन्स अँकडमी येथे झाले .
तो चापगांव ( ता.खानापूर) ग्राम पंचायतीचे वाटर मॅन विलास पांडुरंग पाटील यांचा तो मुलगा होय.
त्याला कोगनोळी युवा सायन्स अँकडमी काॅलेजचे प्राध्यापक अनमोल पाटील व अविनाश पाटील तसेच प्रशिक्षक अविनाश पाटील याचे मार्गदर्शन लाभत आहे.
तर आई वडिलाचे प्रोहत्सान लाभत आहे.
त्याच्या यशामुळे त्याचे खानापूर तालुक्यात अभिनंदन होत आहे.