
#लग्नासाठी आलेल्या वर्हाडीतील मुलगी जखमी!
संदेश क्रांती न्यूज :
खानापूर (सुहास पाटील )
सध्या लग्न सोहळ्याची धामधुम जोरात सुरू आहे. त्यातच वीजेच्या कडकड्यासह वादळी पाऊस ही पडत वीजा ही पडत आहेत.
अशाच प्रकारे बेळगाव पणजी महामार्गावरील सावरगाळी ( ता.खानापूर ) गावात लग्नसोहळ्याला आलेली एक मुलगी वीजेच्या धक्याने गंभीर जखमी होऊन बेशुध्द झाली व एक झाड मधोमध चिरल्याची घटना बुधवारी दि.१४ रोजी दुपारी घडली.
घटनास्थळावरून मिळालेली माहिती अशी की बुधवारी दि.१४ रोजी सावरगाळी येथे लग्न सोहळा होता. दुपारी अचानक वीजेच्या गडगडासह पावसाला सुरूवात होणार म्हणून लग्नाला आलेल्या वर्हाडातील लोकानी पावसापासुन बचाव होण्यासाठी जवळ असलेल्या शाळेचा आसरा घेतला.तर काही लोकानी शेजारी असलेल्या घरांचा असरा घेतला.
परंतु एक अकरा वर्षाची मुलगी व तिची आजी व पाहुणी वर्हाड घेऊन आलेल्या डेपोचा असरा घेतला.इतक्यात वीजेचा कडकडात सुरू झाला.तेवढ्यात टेपोजवळ असलेल्या झाडावर वीज कोसळली. त्यामुळे झाड मधोमध चिरले.त्यात टेंपोखाली बसलेली ११ वर्षाची मुलगी गंभीर जखमी झाली व बेशुध्द पडली.व दोन महिला किरकोळ जखमी झाल्या. लागलीच गंभीर जखमी झालेल्या मुलीला उपचारासाठी बेळगाव येथील के एल ई हाॅस्पिटल मध्ये दाखल करण्यात आले. गंभीर जखमी झालेली मुलगी निडगल गावची असल्याचे समजते.