
#चेअरमन डाॅ.नाडगौडांच्याहस्ते ध्वजारोहण!
संदेश क्रांती न्यूज :
खानापूर ( सुहास पाटील )
खानापूर शहरातील समर्थ इंग्रजी शाळेत ७६ वा प्रजासत्ताक दिन उत्साहात साजरा करण्यात आला.
समर्थ इंग्रजी शाळेचे चेअरमन व खानापूर तालुका डाॅक्टर असोसिएशन चेअरमन डाॅ.डी.ई.नाडगौडा यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आला.
यावेळी खजिनदार डाॅ.पी एन पाटील, संचालक डाॅ कदम ,अरविंद जोरापूरे,नारायण चोपडे,आदीच्याहस्ते महात्मा गांधीजीच्या ,डाॅ.बाबासाहेब आंबेडकर आदीच्या फोटोचे पुजन व दीपप्रज्वलन करण्यात आले.
यावेळी बोलताना चेअरमन डाॅ.डी.ई.नाडगौडा यानी प्रजासत्ताक दिनाचे महत्व विद्यार्थ्याना सांगीतले.
प्रारंभी प्राचार्या सौ दीव्या नाडगौडा यांनी प्रास्ताविक करून उपस्थितांचे स्वागत केले.
कार्यक्रमाचे सुत्रसंचालन व आभार जोजफ नरीना यानी मानले.